co operative society Archives | News 24 Tass Marathi

विवेकानंद सौहार्द सोसायटीतर्फे महिला दिन साजरा
भगिनी निवेदिता ठेव योजनेचा प्रारंभ

बेळगाव : येथील सहकार क्षेत्रातील ग्राहकांच्या विश्वासास अल्पावधीत पात्र ठरलेल्या विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीतर्फे सोमवारी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सोसायटीतर्फे केवळ महिलांसाठी भगिनी निवेदिता ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालिका नीता कुलकर्णी होत्या.

कर्मचारी सौ.अर्चना दरवंदर यांनी प्रास्ताविक व सेक्रेटरी पद्मा बाडकर यांनी स्वागत केले. यानंतर प्रज्ञा शानभाग, रजनी गुर्जर, सुमन नाडगौडा, धनुजा पाटील, रुपाली हवालदार यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.भगिनी निवेदिता ठेव योजना ही महिलांसाठी लाभदायक आहे. या ठेवींतर्गत किमान दहा हजार वा त्याहून अधिक रक्कम ३० महिन्यांच्या कालावधीसाठी ठेवता येते, असे यावेळी सांगण्यात आले.

सोनम मंगनाकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालिका, सभासद महिला व हितचिंतक उपस्थित होत्या.

The post विवेकानंद सौहार्द सोसायटीतर्फे महिला दिन साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

जनकल्याण फौंडेशनचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात
हळदीकुंकू, सत्कार व विविध उपक्रमांनी रंगला सोहळा

मण्णूर : जय जन कल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर संचलित जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशनचा ९ वा वर्धापनदिन आणि हळदीकुंकू समारंभ अनन्य फार्म हाऊस येथे उत्साहात पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांना विशेष अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थापक सहकाररत्न एल. के. कालकुंद्री सर व चेअरमन लक्ष्मण मंडोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती मातेस पुष्पांजली बेळगावच्या माजी उपमहापौर सौ. रेणू किल्लेकर यांनी अर्पण केली, तर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महिला संचालक मंडळाच्या हस्ते झाले. यानंतर सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रास्ताविकात एल. के. कालकुंद्री यांनी सहकारी संस्था ही कोणत्याही व्यक्तीची नसून ती सर्व सभासदांची असते, विश्वास हा सहकाराचा कणा आहे आणि सामाजिक बांधिलकीतूनच संस्थेचे कार्य सुरू असल्याचे नमूद केले. व्यवस्थापक महेश काकतकर यांनी संस्थेच्या उद्दिष्टांचा व कार्याचा आढावा घेतला.

प्रमुख पाहुण्या सौ. रेणू किल्लेकर यांनी महिलांना स्वयंपूर्णतेसाठी स्वतंत्र उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्ते अनिल चौधरी सर यांनी महिलांनी जीवनातील अडचणींना समर्थपणे सामोरे जावे, मुलांना स्वावलंबनाचे व संस्कारांचे धडे द्यावेत, असे मार्गदर्शन केले. अल्पावधीतच संस्थेने केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी फौंडेशनमार्फत आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. अग्निवीरमध्ये भरती झालेल्या युवक-युवतींचा तसेच गावातील पदवीधर विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, सल्लागार नारायण शहापुरकर, सिद्राय बाळेकुंद्री, परशराम कदम, जयवंत मंडोळकर, जोतिबा चौगुले, मल्लाप्पा कोतेकर, कल्लाप्पा अष्टेकर, मारुती बामणे, नारायण कालकुंद्री, दत्तू चौगुले, एम. बी. सांबारेकर, रामा चौगुले, तानाजी तरळे, आनंद बाळेकुंद्री, शीतल चौगुले, लता कडोलकर तसेच कर्मचारी पूनम डोंगरे, प्रतीक्षा चौगुले, सुनील सांबरेकर, मेघा बांदेकर, पिग्मी कलेक्टर यलाप्पा पाटील, प्रभाकर देसुरकर आणि अ वर्ग सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नावगेकर टीचर यांनी केले, तर व्यवस्थापक महेश काकतकर यांनी आभार मानले.

The post जनकल्याण फौंडेशनचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात
येळळूर, ता. २३ : येथील नेताजी मल्टीपर्पज को – ऑप. सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील होते. सोसायटीचे चेअरमन डी.जी. पाटील व व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांच्याहस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. तर नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे, संचालक प्रा.सी.एम गोरल व रवींद्र गिंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी बोलताना चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, गेल्या २४ वर्षांपूर्वी म्हणजेच २००१ साली आम्ही नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना स्वातंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून केली. सोसायटीला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे. संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार व हितचिंतक तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे व झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्थेने अल्पावधीतच गरुड झेप घेत, येळ्ळूर व परिसरात आपला नावलौकिक मिळवला आहे. वडगाव व येळ्ळूर येथे स्वतःच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर परमेश्वरनगर येळ्ळूर येथे नेताजी मराठी सांस्कृतिक भवनाची उभारणी करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनीही संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संचालक बी. डी. छत्र्यान्नावर, संजय मजुकर, सी. एम. उघाडे, परशराम गिंडे, शंकर मुरकुटे, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, डॉ. कुलदीप लाड, सेक्रेटरी दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, विजय धामणेकर, रवि कणबरकर, कांचन पाटील, ज्योती यरमाळकर,सोनाली सायनेकर, संगीता दणकारे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सी. एम. गोरल यांनी केले. तर आभार दीपक हट्टीकर यांनी मानले.

The post येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.