cleanliness campaign Archives | News 24 Tass Marathi

कॅन्टोन्मेंटमधील सार्वजनिक ठिकाणांच्या अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
पोलीस आणि महापालिका प्रशासनाला सहकार्याचे आवाहन

बेळगाव : कॅन्टोन्मेंट परिसरातील बसस्थानके, पदपथ आणि उद्यानांमध्ये वाढत चाललेल्या अस्वच्छतेच्या समस्येकडे लक्ष वेधत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरिविजय मंचालवार यांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त पातळीवर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वास्तव्यास असलेल्या निराश्रित कुटुंबांच्या सुरक्षित पुनर्वसनाचीही त्यांनी मागणी केली आहे.

सुदाम हरिविजय मंचालवार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पथकाने बुधवारी पहाटे रेल्वे स्टेशन बसस्थानक, गोगटे सर्कल आणि मिलिटरी महादेव मंदिर परिसराची पाहणी केली. या वेळी अनेक कुटुंबे सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता आश्रय घेत असल्याचे तसेच परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे स्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.

या परिस्थितीचा परिणाम खानापूरसह विविध भागांतून येणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी यांच्यावर होत असून स्वच्छता मोहिमांनाही अडथळे निर्माण होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. आर्थिक अडचणी आणि बेरोजगारीमुळे अनेक कुटुंबे सार्वजनिक ठिकाणी राहण्यास मजबूर झाल्याचेही समोर आले आहे.

पावसाळा जवळ आल्याने महिला आणि लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनू शकतो. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासन आणि महापालिकेने संयुक्त पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मंचालवार यांनी केली आहे.

तसेच सार्वजनिक ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे शासकीय निवारा केंद्रे किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे आणि सामाजिक संस्थांनीही या पुनर्वसन मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

The post कॅन्टोन्मेंटमधील सार्वजनिक ठिकाणांच्या अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर appeared first on News 24 Tass Marathi.

पूरस्थिती टाळण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाची मान्सूनपूर्व नाला स्वच्छता मोहीम
जिजामाता सर्कलजवळील नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू

स्मार्ट सिटी व महापालिकेला सहकार्याचे आवाहन

बेळगाव : मान्सूनपूर्व काळात शहरातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने नालेसफाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. फोर्ट रोडवरील जिजामाता सर्कलजवळील नाल्यात साचलेला गाळ व कचरा काढण्याचे काम सुरू असून, हे काम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटी आणि महापालिकेने तातडीने सहकार्य करावे, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरिविजय मंचलवार यांनी केले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने आज सकाळी ६ वाजल्यापासून जिजामाता सर्कल परिसरात नालेसफाई मोहीम सुरू करण्यात आली. या कामासाठी स्वच्छता कर्मचारी, जेसीबी आणि डंपर वाहनांची मदत घेतली जात आहे. सीबीटी बसस्थानक परिसरातून वाहून येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचऱ्यामुळे नाल्यात अडथळे निर्माण झाले असून पाण्याचा प्रवाह बाधित होत आहे.

मात्र, संबंधित नाला सुमारे सहा फूट खोल असून त्यावर काँक्रीटचा स्लॅब असल्याने प्रत्यक्ष साफसफाईसाठी केवळ तीन फूट जागा उपलब्ध आहे. त्यामुळे जेसीबीद्वारे कचरा काढण्यास मोठ्या अडचणी येत असून लहान बादल्यांच्या सहाय्याने काम करावे लागत आहे. परिणामी साफसफाईची गती मंदावली आहे.

याबाबत बोलताना सीईओ सुदाम मंचलवार म्हणाले की, हा नाला स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अखत्यारीत येत असल्याने नाल्यावरील सुमारे १२ फूट काँक्रीट स्लॅब काढून टाकण्याची आवश्यकता आहे. तसेच महापालिकेने अतिरिक्त जेसीबी आणि डंपर उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण नाला अवघ्या १५ दिवसांत स्वच्छ करता येईल. अन्यथा आगामी पावसाळ्यात या भागातील व्यावसायिक परिसरात पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

स्वच्छता कामगारांना कोणत्याही परिस्थितीत नाल्यात उतरवू नये आणि सर्व काम यंत्रसामग्रीच्या सहाय्यानेच करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नालेसफाई मोहीम यशस्वी करण्यासाठी स्मार्ट सिटी आणि महापालिकेने तातडीने सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.

The post पूरस्थिती टाळण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाची मान्सूनपूर्व नाला स्वच्छता मोहीम appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरात प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान
नियमभंग आणि अतिक्रमण करणाऱ्यांना प्रशासनाचा इशारा

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने परिसर प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सीईओ सुदाम विजय मंचळकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पहाटेपासून व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांना कडक इशाराही देण्यात आला.

ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, आमदार आसिफ (राजू) सेठ आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य सुधीर कुप्पेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या मोहिमेचा निर्णय घेण्यात आला होता.  त्यानुसार सकाळी सहा वाजल्यापासून प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली.

या मोहिमेत ८४ स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले असून नाले, गटारी आणि खेळाच्या मैदानांमधून आतापर्यंत सुमारे एक टन प्लास्टिक कचरा हटवण्यात आला आहे. मात्र, बोगरवेस नाल्याजवळ प्लास्टिक पिशव्यांमध्ये टाकलेला वैद्यकीय कचरा तसेच हॉटेलमधील कचरा आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातील काही भागांमध्ये बाहेरील व्यक्तींकडून रस्त्याकडेला बेकायदेशीररीत्या कचरा टाकला जात असल्याचेही निदर्शनास आले.

सीईओ सुदाम विजय मंचळकर यांनी प्लास्टिक कचऱ्यामुळे गटारे तुंबणे, डासांची वाढ होणे तसेच डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचे सांगितले.

दरम्यान, स्वच्छता मोहिमेदरम्यान काही नागरिकांनी घरांसमोर लोखंडी शेड आणि इतर बांधकामे करून रस्त्यांवर अतिक्रमण केल्याचे उघड झाले. या अतिक्रमणांमुळे अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि स्वच्छता वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अनधिकृत बांधकामे तातडीने हटवावीत, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता तो थेट कचरा संकलन वाहनांकडेच द्यावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

The post बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरात प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान appeared first on News 24 Tass Marathi.

सुट्टीच्या दिवशी तरुणांकडून राजहंसगडाची स्वच्छता
शिवतेज युवा संघटनेचा स्तुत्य उपक्रम

बेळगाव : मच्छे, वाघवडे आणि देसूर परिसरातील युवकांनी रविवारची सुट्टी समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करत राजहंसगड स्वच्छतेचा उपक्रम राबविला. पर्यटनस्थळी मौजमजा करण्याऐवजी गड संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याने या तरुणांचे कौतुक होत आहे.

मच्छे येथील शिवतेज युवा संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या रविवारी तसेच १० तारखेला युवकांनी राजहंसगड परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. गड परिसरातील प्लास्टिक कचरा, रिकाम्या बाटल्या आणि अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

बेळगाव तालुक्यातील राजहंसगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित महत्त्वाचा गड मानला जातो. अलीकडच्या काळात येथे पर्यटकांची संख्या वाढू लागली असून शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि पर्यटक भेट देत आहेत. निसर्गरम्य वातावरणामुळे प्री-वेडिंग शूटसाठीही अनेक जोडपी येथे येत असल्याचे दिसून येते. मात्र काही ठिकाणी मद्यपान करून बाटल्या व कचरा टाकण्याचे प्रकारही वाढले आहेत.

गड परिसरात वाढणारा प्लास्टिक व इतर कचरा लक्षात घेऊन युवकांनी “एक दिवस गड संवर्धनासाठी” हा संदेश देत स्वच्छता मोहीम हाती घेतली. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाचे प्रतीक असलेले गड-किल्ले जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याची भावना यावेळी युवकांनी व्यक्त केली.

शिवतेज युवा संघटनेच्या या उपक्रमामुळे इतर तरुणांसमोरही सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला आहे.

The post सुट्टीच्या दिवशी तरुणांकडून राजहंसगडाची स्वच्छता appeared first on News 24 Tass Marathi.