citizens council belagavi Archives | News 24 Tass Marathi

सिटीज – २ संदर्भात सिटीझन्स कौन्सिलचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन
प्रकल्प बेळगावसाठी सुरक्षित ठेवण्याकरिता हस्तक्षेप करण्याची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

शहरासाठी मंजूर झालेल्या सिटीज २.० प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प बेळगावसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सिटीझन्स कौन्सिल बेळगाव या संघटनेने प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. यांच्याकडे केली आहे.

संघटनेचे सदस्य सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी प्रादेशिक आयुक्तांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी सिटीज २.० प्रकल्पाची सविस्तर माहिती देत निवेदन सादर करण्यात आले.

प्रादेशिक आयुक्तांनी निवेदन स्वीकारून हा प्रकल्प बेळगावसाठीच कायम राहील याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिले. सुमारे १३५ कोटी रुपयांच्या या योजनेचा उद्देश शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत आणि लवचिक शहरी पायाभूत सुविधा विकसित करणे हा आहे.

मात्र निधीतील प्रलंबित हिस्सा, निविदा प्रक्रिया आणि प्रशासकीय अडचणी यांमुळे कामात विलंब होत असल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या या विलंबाचा प्रकल्पाच्या वेळेवर अंमलबजावणीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मंजूर निधी मागे घेतला जाण्याची किंवा तो अन्य शहराकडे वळविण्यात येण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात प्रादेशिक आयुक्तांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घ्यावा, संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, प्रलंबित निविदा व प्रशासकीय प्रक्रिया त्वरीत पूर्ण कराव्यात आणि बेळगावसाठी प्रकल्पाचे वाटप अबाधित राखण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. निवेदन सादर करताना बसवराज जवळी, विकास कलघटगी, मुकेश खोडा, नितीश जैन, कमलेश खोडा आदी सदस्य उपस्थित होते.

The post सिटीज – २ संदर्भात सिटीझन्स कौन्सिलचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन appeared first on News 24 Tass Marathi.