camp Archives | News 24 Tass Marathi

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ शिबिर यशस्वी
कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी शाळेत २७२ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी

बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांमधील ॲनिमियाचे लवकर निदान आणि आरोग्य जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने हॅपीहार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी शाळा येथे ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ अभियानांतर्गत आणखी एक तपासणी शिबिर यशस्वीरित्या आयोजित केले.

या शिबिरामध्ये एकूण २७२ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (Hb) तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ॲनिमियाचे निदान झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्य आणि पोषणस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी आवश्यक मार्गदर्शन व तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात आली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल पर्याय फाउंडेशनचे रोटरी क्लबतर्फे विशेष आभार मानण्यात आले. तसेच या समाजोपयोगी उपक्रमात योगदान देणाऱ्या क्लबच्या सर्व सदस्यांचे आणि स्वयंसेवकांचेही कौतुक करण्यात आले.

हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि समाजात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी क्लब अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

The post रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ शिबिर यशस्वी appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात गांजा विक्रीवर कॅम्प पोलिसांची कारवाई
दोघांना अटक : २४,७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : शहरातील वेंगुर्ला रोडवरील गांधी सर्कल परिसरात बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४ ऑगस्ट २०२६ रोजी कॅम्प पोलीस ठाण्याचे पीएसआय आर. आय. सनदी आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वेंगुर्ला रोडवरील गांधी सर्कल परिसरात छापा टाकला. यावेळी गणेशपूर येथील लक्ष्मी नगरचा रहिवासी कौशिक कृष्ण मुदलियार (२२) आणि ज्योती नगर येथील चंद्रकांत अनिल थापा (१९) यांना गांजा विक्री करताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

प्राथमिक तपासात दोन्ही आरोपी गंगवाडी येथील मंजुनाथ याच्याकडून गांजा आणून शहरात विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून २ किलो ६० ग्रॅम गांजा (किंमत १३ हजार रुपये), १,७३० रुपये रोख तसेच १० हजार रुपये किमतीचे व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल असा एकूण २४,७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा पुरवठ्याच्या साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ही यशस्वी कारवाई करणाऱ्या सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक, पीएसआय आणि पथकातील कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त तसेच उपायुक्त यांनी कौतुक केले आहे.

The post बेळगावात गांजा विक्रीवर कॅम्प पोलिसांची कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

रोटरी दर्पणच्या दोन दिवसीय ॲनिमिया तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सेंट अँथनीज स्कूलमध्ये ४०० हून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे हॅपी हार्ट फाउंडेशन आणि श्री ऑर्थो ट्रॉमा केअर सेंटर, बेळगाव यांच्या सहकार्याने सेंट अँथनीज स्कूल येथे आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय ॲनिमिया (रक्ताल्पता) तपासणी शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराचा लाभ ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये रक्ताल्पतेबाबत जनजागृती करणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. दोन दिवस चाललेल्या शिबिरात विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. त्यामुळे रक्ताल्पतेचे लवकर निदान होऊन वेळेत योग्य उपचार आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या आरोग्य उपक्रमाला विद्यार्थी, शाळा प्रशासन तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजाच्या आरोग्यवृद्धीसाठी जनजागृती, वेळेवर निदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यावर भर देण्याच्या रोटरीच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे हॅपी हार्ट फाउंडेशन, श्री ऑर्थो ट्रॉमा केअर सेंटर, सेंट अँथनीज स्कूलचे व्यवस्थापन व कर्मचारी, सहभागी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक आणि सर्व रोटरी सदस्यांचे आभार मानण्यात आले.

“Service Above Self” (स्वार्थापेक्षा सेवा) या ब्रीदवाक्याला अनुसरून समाजाच्या आरोग्यवृद्धीसाठी आणि भावी पिढीचे आरोग्य अधिक सुदृढ करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने केले जाईल, असा विश्वास रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमाचे नेतृत्व रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटे. डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी, सचिव रोटे. ज्योती कुलकर्णी आणि कार्यक्रम अध्यक्षा रोटे. डॉ. स्मृती प्रधान यांनी केले.

The post रोटरी दर्पणच्या दोन दिवसीय ॲनिमिया तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
बेळगाव : हॉकी खेळाडूमध्ये एकाग्रता हवी, बेळगावात एस्ट्रोटर्फ मैदानाची नितांत गरज आहे यासाठी प्रयत्न करू असे जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव यांनी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दिले.

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून प्रशिक्षणार्थीनी परिश्रम घेणे महत्त्वाचे आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून हॉकी खेळाडूना मदतीचे आश्वासन युवा उद्योजक कपिल भोसले यांनी सांगितले.

मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराच्या व्यासपीठावर माजी उपमहापौर आनंद चव्हाण, जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव, युवा उद्योजक कपिल भोसले, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर व सभासद उपस्थित होते.

बेळगाव हॉकीच्या ९ खेळाडूंची हॉस्टेलमध्ये तसेच अग्निवीर आणि मराठा सेंटरमध्ये देखील हॉकी खेळाडूंची निवड झाली असून करियर घडवण्यामध्ये हॉकी खेळ योग्य असल्याचे सुधाकर चाळके यांनी प्रारंभी सांगितले.

हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. १५० मुलां – मुलींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणार्थीना दरऱोज अंडी, केळी, दुध देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण शिबिरात उत्तम शिंदे, राजू देशनूर, नामदेव सावंत, बकुल काळोजी, प्रशांत मंकाळे या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे हॉकी खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. उद्घाटन समारंभाला श्रीकांत आजगांवकर, सागर पाटील, दत्तात्रय जाधव , संजय शिंदे, रमाकांत कारेकर, प्रकाश बिळगोजी, सुरेश पोटे, मनोहर पाटील, शांताप्पा नरगुदी, गणपत गावडे, नामदेव सावंत, विकास कलघटगी, गोपाळ खांडे, अनिल राणे, शिवानंद गोडबोले, अश्वगंधा कुगजी, प्रिया जैन, सविता वेसणे, सुप्रिया कारेकर, मनिषा गोडबोले आदी सभासद उपस्थित होते.

The post मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा आज शुभारंभ
बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. ‘जाॕईन स्पोर्टस् फॉर लाइफ’ या ब्रीदवाक्यासह मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरास मार्कंडेय सोसायटीचे अध्यक्ष प्रसाद चौगुले प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत.

मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटन समारंभास बेळगाव महापालिकेच्या महापौर प्रिती कामकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव, ते युवा उद्योजक कपिल भोसले तसेच हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्षा पूजा जाधव, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर व सभासद उपस्थित राहणार आहेत.

प्रशिक्षण शिबिरात उत्तम शिंदे, राजू देशनूर, नामदेव सावंत, बकुल काळोजी, प्रशांत मंकाळे या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे हॉकी खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. १५० मुलां मुलींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणार्थीना दरऱोज अंडी, केळी, दुध देण्यात येणार आहे.

The post हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा आज शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

संस्कृती एज्युकेअरतर्फे २ एप्रिलपासून मुलांसाठी स्वयं-विकास शिबिर
बेळगाव / प्रतिनिधी

टिळकवाडी, बेळगाव येथील संस्कृती एज्युकेअर संस्थेतर्फे ११ वर्षांवरील मुलांसाठी स्वयं-विकास शिबिराचे आयोजन २ एप्रिल २०२६ पासून करण्यात आले आहे. सदर शिबिर पंचवटी प्लाझा देशमुख रोड टिळकवाडी बेळगाव येथे दि. २ एप्रिल ते १६ एप्रिल आणि दि. १ मे ते १५ मे या कालावधीत दोन बॅचेसमध्ये घेतले जाणार आहे.

दररोज सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शिबिर घेतले जाईल. शिबिराचे केंद्रित विषय नैतिक मूल्ये, सामाजिक वर्तन, सांघिक कार्य, कौशल्य व व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, सकारात्मक विचार, भावनांचे व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, सार्वजनिक भाषण, ध्यान, नकार पचवणे, विशेष सहली, खेळ व मनोरंजक उपक्रम, संगीतोपचार अशा विषयांवर असतील.

शिबिराच्या समारोपावर मुलांसाठी विशेष भेटवस्तू तसेच सर्व सहभागींसाठी दुपारचे जेवण दिले जाईल. पालकांनी आपल्या मुलांना या शिबिराचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन मानसशास्त्रज्ञ आणि मार्गदर्शक तेजस कोळेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९९१६८३५५५० किंवा ६३६००८४२८६ क्रमांकावर संपर्क साधता येईल.

The post संस्कृती एज्युकेअरतर्फे २ एप्रिलपासून मुलांसाठी स्वयं-विकास शिबिर appeared first on News 24 Tass Marathi.

हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. ‘स्पोर्टस् फॉर लाइफ’ या ब्रीदवाक्यासह मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शिबिरात हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्षा पूजा जाधव, प्रकाश कालकुंद्रीकर, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, प्रशांत मांगले या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे हॉकी खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे.

बेळगावातील जास्तीत जास्त मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि हॉकी या राष्ट्रीय खेळात आपले कौशल्य दाखवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे शिबिर पूर्णपणे मोफत असून, शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी सुधाकर चाळके किंवा उत्तम शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांनी कळविले आहे.

The post हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन appeared first on News 24 Tass Marathi.

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘समर कॅम्प’चा जल्लोष
“स्विमिंग” आणि “हॉर्स रायडिंग” चे विशेष आकर्षण

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प बेळगाव येथे ‘समर कॅम्प’चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एसएमसी कमिटीचे सदस्य अरविंद संगोळ्ळी यांचे विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या नियोजनाखाली हे शिबिर प्रगतीपथावर आहे.

यंदाच्या शिबिरात हॉर्स रायडिंग हे मुख्य आकर्षण ठरत असून, घोड्यावर स्वार होऊन रपेट मारताना विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या साहसी खेळामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होत आहे. तसेच, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर स्विमिंग या उपक्रमाचाही विद्यार्थी मनमुराद आनंद लुटत आहेत.

केवळ खेळच नव्हे, तर मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी योगासने, तायक्वांदो, संगीत, नृत्य आणि आर्ट अँड क्राफ्ट यांसारख्या विविध उपक्रमांचा यात समावेश आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया मजबूत करण्यासाठी ‘बेसिक क्लासेस’चेही आयोजन करण्यात आले आहे.

शाळेने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले असून, मुलांच्या आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी हे शिबिर अत्यंत लाभदायक ठरत असल्याचे मत व्यक्त केले आहे. हे शिबिर २४ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्ग शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

The post ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘समर कॅम्प’चा जल्लोष appeared first on News 24 Tass Marathi.