Business Archives | News 24 Tass Marathi

खाण – स्टोन क्रशर मालकांवर कोट्यवधींच्या दंडाची टांगती तलवार
सरकारच्या नव्या नियमांमुळे उद्योग संकटात ; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

बेळगाव : खाण आणि भूविज्ञान विभागाकडून खाण व स्टोन क्रशर मालकांवर पूर्वलक्षी प्रभावाने कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्याची तयारी सुरू असून, त्यामुळे संपूर्ण कर्नाटकातील बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आरोप बेळगाव जिल्हा स्टोन क्रशर मालक संघटनेचे अध्यक्ष संजीव हट्टीहोळी यांनी केला आहे.

शुक्रवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हट्टीहोळी यांनी सांगितले की, खाण आणि भूविज्ञान विभागाने गौण खनिज संमेलन अधिनियम, १९९४ अंतर्गत एकवेळच्या दुरुस्तीद्वारे नियम ४४अ लागू केला आहे. या नियमाअंतर्गत २००६-०७ पर्यंतच्या सामान्य बांधकाम दगडांच्या उत्पादनाचा पूर्वलक्षी प्रभावाने आढावा घेतला जात आहे.

कर्नाटक गौण खनिज अधिनियम १९९४ लागू झाल्यापासून खाणकाम कंत्राटदार आणि परवानाधारकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून व्यवसाय केला आहे. मात्र, नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी उपस्थित केलेल्या लेखापरीक्षण आक्षेपांनंतर आता विभागाकडून खाण कंत्राटदार आणि परवानाधारकांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

अनेक वर्षांपासून शासनाने आखून दिलेल्या नियमांनुसार काम करणाऱ्या उद्योगांवर प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटींचा संपूर्ण भार टाकणे अन्यायकारक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. प्रस्तावित दंडवसुलीमुळे राज्यातील महत्त्वाचे एमएसएमई क्षेत्र संकटात सापडेल, हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा येईल तसेच बांधकाम, गृहनिर्माण, रस्ते, सिंचन आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर प्रतिकूल परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

या निर्णयामुळे अनेक खाण व स्टोन क्रशर उद्योग आर्थिक अडचणीत सापडून त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संजीव हट्टीहोळी यांनी दिला.

The post खाण – स्टोन क्रशर मालकांवर कोट्यवधींच्या दंडाची टांगती तलवार appeared first on News 24 Tass Marathi.

ई-मालमत्ता प्रमाणपत्रासाठी बेळगावमधील उद्योजकांची निदर्शने
बेळगाव / प्रतिनिधी

ई-मालमत्ता प्रमाणपत्रासाठी अनेक महिन्यांपासून महापालिकेच्या दिरंगाईविरोधात संतप्त असलेल्या बेळगावमधील उद्योजकांनी आज अशोकनगर येथील महानगरपालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

उद्योजकांचा आरोप आहे की, हुबळी-धारवाडपेक्षा बेळगाव महानगरपालिकेचे नियम वेगळे असून ई-मालमत्ता प्रमाणपत्रासाठी जास्त शुल्क आकारले जाते. आज प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊनही अधिकारी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे उद्योजकांनी सांगितले की, “आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही.”

गेल्या ५–६ महिन्यांपासून ई-मालमत्ता प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा सुरू असून, तरीही काम पूर्ण झालेले नाही. एजंटमार्फत काम तत्काळ होण्याच्या तुलनेत सर्वसामान्य नागरिकांना अयोग्य त्रास दिला जात आहे, असे आंदोलकांनी तक्रार केली.

महानगरपालिका क्षेत्रातील औद्योगिक वसाहतींना प्रमाणपत्र देण्यात जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचेही उद्योजकांचे म्हणणे आहे. यामुळे मालमत्तांची खरेदी-विक्री ठप्प झाली असून, ५ टक्के करवाढीचा बोजा नागरिकांवर येत आहे. ऑटोनगर औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांना प्रमाणपत्र मिळवण्यासही अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्योजकांनी सांगितले की, हुबळी-धारवाड महापालिकेच्या धर्तीवर प्रक्रिया राबवण्याचे ठराव मंजूर झाले असूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, आणि म्हणूनच त्यांचा संताप व्यक्त केला आहे.

The post ई-मालमत्ता प्रमाणपत्रासाठी बेळगावमधील उद्योजकांची निदर्शने appeared first on News 24 Tass Marathi.

दिवाळीच्या तोंडावर ‘सोने’ महागले !
२४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर तब्बल रू. १,२५,००० /-

सर्वसामान्यांना फटका : लग्नसराईत बजेट कोलमडणारं

बेळगाव / प्रतिनिधी

महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या सामान्य जनतेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना, सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. साधारणपणे १७ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होईल आणि या काळात सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

शहरातील सराफी बाजारात सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा तब्बल १,२५,००० इतका झाला आहे. काही महिन्यांपूर्वी हेचं सोने लाखाच्या घरात होते. गेल्या काही महिन्यांत बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच दर वाढू लागले आणि आता ते उच्चांक गाठत आहेत. दर कमी असताना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जात होते. परंतु आता दर वाढल्याने खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे.

ग्राहकांची हतबलता :

प्रतिक्रिया : सौ. माधुरी जाधव (समाजसेविका)

दिवाळी आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढत असते. दिवाळीनंतर लग्नसराई सुरु होते. “घरातील लग्नसराईत सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र आणि दागिने खरेदी करणे भाग आहे. पण सोन्याचे सध्याचे भाव पाहता हात आखडता घ्यावा लागत आहे. आवश्यक तितकेच सोने घेता येते, बाकी इच्छा असूनही मागे हटावे लागत आहे.” सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील भू-राजकीय तणाव आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता यामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढली आहे. या वाढत्या दरांचा थेट परिणाम दिवाळीच्या निमित्ताने सोने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. याशिवाय झटपट पैसे कमवण्यासाठी गुन्हेगारीचे (चोरी, लुटमारी) प्रकार वाढण्याचा धोका आहे.

The post दिवाळीच्या तोंडावर ‘सोने’ महागले ! appeared first on News 24 Tass Marathi.