Breaking News Archives | News 24 Tass Marathi

न्यायालयाच्या आवारातच रौडीशीटरकडून धिंगाणा
पत्रकारांवर हल्ल्याचा प्रयत्न

बेळगाव : शहरातील न्यायालयाच्या आवारातच रौडीशीटरकडून पत्रकारांवर हल्ला आणि अर्वाच्च शिवीगाळ केल्याची गंभीर घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहबाज पठाण खून प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या रौडीशीटरांनी कोर्ट परिसरातच गोंधळ घातला. कर्तव्य बजावत असलेल्या माध्यम प्रतिनिधींवर हल्ला करून त्यांना धमकावण्यात आले. तसेच अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली.

या प्रकरणात रौडीशीटर लक्ष्मण दड्डी याच्यासह सवीन दड्डी, बसवराज दड्डी आणि बसवण्णी नाईक यांना न्यायालयात हजर करून पुन्हा हिंडलगा कारागृहात हलविण्यात येत असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

The post न्यायालयाच्या आवारातच रौडीशीटरकडून धिंगाणा appeared first on News 24 Tass Marathi.

लालकिल्ला परिसरातील स्फोटात ८ जणांचा मृत्यू
अनेकजण जखमी ; संपूर्ण देशात खळबळ

दिल्लीसह पुणे – मुंबईतही हायअलर्ट जारी

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळील कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या कारला देखील आग लागली. स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळील गेट नंबर १ वर सायंकाळी ६. ४५ वाजता हा स्फोट झाला. स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. वर्दळीच्या ठिकाणी हा स्फोट झाला आहे. पोलिसांनी या स्फोटामागचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळ कारचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. स्फोटानंतर ३ ते ४ वाहनांना आग लागली. या स्फोटात प्रचंड नुकसान झालं आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर २४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. स्फोटाविषयी प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या घरांना देखील हादरा बसला आहे. स्फोट झाल्यानंतर क्षणार्धात आजूबाजूच्या काही वाहने जळून खाक झाल्या. प्रत्यक्षदर्शी राजधर पांडे यांनी सांगितले की, आम्ही घरातून कारला आग लागल्याचे पाहिले. त्यानंतर आम्ही नेमके काय झाले, हे पाहण्यासाठी पोहोचले. त्यानंतर स्फोट झाल्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळापासून जवळच राहतो.

दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट :

दिल्लीमध्ये स्फोटाची घटना घडल्यानंतर मुंबई पोलिसांनी सावधगिरीची उपाययोजना अधिक कडक केल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीनंतर मुंबई शहरातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

The post लालकिल्ला परिसरातील स्फोटात ८ जणांचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

सुनिता विलियम्स यांचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरु
भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे पृथ्वीवर परतणार

न्यूयॉर्क : अमेरिकन अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि बुच विल्मर यांना घेऊन एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे स्पेसक्राफ्ट ड्रॅगनचा पृथ्वीकडे प्रवास सुरु झाला आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रापासून स्पेसक्राफ्ट अनडॉक झाले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी पहाटे साडे तीन वाजता ते पृथ्वीवर पोहोचेल.

सुरुवातीला दोघेही बुधवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निघणार होते. मात्र ‘स्पेस एक्स’बरोबर चर्चा केल्यानंतर आणि फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेऊन आज, मंगळवारीच दोघांच्या परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, ‘नासा’ने जाहीर केले.

सुनिता विलियम्स आणि बुच विल्मर जून महिन्यापासून म्हणजेच तब्बल नऊ महिने अंतराळात अडकले होते. नासा आणि आणि स्पेसएक्स कडून प्रयत्न करत त्यांना परत आणले जात आहे. त्यांच्यासोबत निग हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव देखील परत येणार आहेत. नासाने सुनिता विलियम्स यांच्या परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी केले आहे. वातावरणातील बदलामुळे यामध्ये बदल होऊ शकतो. साधारणपणे हा प्रवास १७ तासांचा असेल.

आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र ते पृथ्वीचा प्रवास असा असेल…

रविवारी ‘आयएसएस’मध्ये पोहोचलेल्या १०व्या चमूकडे सुनीता आणि बुच यांच्या नवव्या चमूने सूत्रे सोपविल्यानंतर दोघांच्याही परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली.

‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’च्या तंत्रज्ञांची बैठक होऊन फ्लोरिडामधील वातावरणाचा अंदाज घेण्यात आल्यानंतर परतीचा प्रवास एक दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतीय प्रमाणवेळेनुसार आज, मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता ‘स्पेस एक्स ड्रॅगन क्रू’ या अंतराळयानाचे ‘हॅच’ बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल. या क्षणापासून ‘नासा’च्या संकेतस्थळावर परतीच्या प्रवासाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

‘नासा’चे अंतराळवीर निक हेग आणि रशियाच्या ‘रॉसकॉसमॉस’चे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेदेखील सुनीता आणि बुच यांच्यासह परतीचा प्रवास करणार आहेत.

वातावरणाने साथ दिल्यास उद्या, बुधवारी पहाटे ३.२७ वाजता सुनीता आणि बुच यांना घेऊन येणारी ‘स्पेस कॅप्सूल’ फ्लोरिडा किनाऱ्यापासून जवळ समुद्रात उतरेल.

The post सुनिता विलियम्स यांचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरु appeared first on News 24 Tass Marathi.