bims hospital Archives | News 24 Tass Marathi

बीम्समध्ये गर्भवती महिलेसह नवजात शिशूचा मृत्यू
नातेवाईकांचा संताप ; उपचारात हलगर्जीपणाचा आरोप

बेळगाव : बेळगावमधील बीम्स रुग्णालयात एका गर्भवती महिलेसह नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरत नातेवाईकांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला.

बेळगाव तालुक्यातील तुरमरी येथील इरम्मा शिगीहळ्ळी (वय २१) या गर्भवतीला १० एप्रिल रोजी बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी नैसर्गिक प्रसूती होईल असे सांगितले होते. मात्र, वेळेवर योग्य उपचार न केल्याने पत्नी आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पती नागराज यांनी केला आहे.

मृत्यू झाल्यानंतर मध्यरात्री गुपचूप सह्या घेऊन मृतदेह पाठवण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. “डॉक्टरांनी ‘नॉर्मल डिलिव्हरी’ होईल असे सांगितले होते. मात्र पत्नी आणि बाळ दगावल्यानंतर माझी सही घेण्यात आली. आम्ही विनंती करत असताना ‘आम्ही डॉक्टर आहोत की तुम्ही?’ असे विचारून आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले,” असे नागराज यांनी सांगितले.

जुलाब थांबल्यानंतर प्रसूती करू, असे डॉक्टरांनी सांगितले होते. हे तिचे पहिलेच बाळंतपण होते. प्रसूती वेदना वाढल्यानंतर सिझेरियन करण्याची विनंती करूनही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले, त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मृत इरम्माची आई गौरव्वा यांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.

The post बीम्समध्ये गर्भवती महिलेसह नवजात शिशूचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

नर्सिंग हे सेवा धर्माचे प्रतीक – मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
‘परिचारिकांचे स्मितहास्यच रुग्णासाठी औषधासमान’

बेळगाव : नर्सिंग हा केवळ व्यवसाय नसून सेवा धर्म आहे. परिचारिका मनाने श्रीमंत आणि उदार असतात. त्यांचे स्मितहास्य, धाडसी शब्द आणि प्रेमळ स्पर्श हे रुग्णासाठी अर्ध्या औषधासमान परिणामकारक ठरतात, असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

शनिवारी बेळगाव येथील बीम्स नवीन इमारतीतील सभागृहात आयोजित शासकीय नर्सिंग स्कूलच्या १०९ व्या तुकडीच्या विद्यार्थ्यांच्या ‘प्रेरणा ज्योती – २०२६’ शपथविधी सोहळ्याचे उद्घाटन व दीपप्रज्वलन करून त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, “तुम्ही निवडलेला व्यवसाय अत्यंत पवित्र आहे. चांगले शिक्षण घ्या, उत्तम काम करा आणि आयुष्यभर सेवा भाव जपा. परिचारिकांची सेवा केवळ रुग्णापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण कुटुंब आणि समाजासाठी असते. डॉक्टर उपचार करतात, मात्र परिचारिका रुग्णाच्या मनाला आधार देते. डॉक्टर काही मिनिटांसाठी येतात, पण परिचारिका सतत रुग्णासोबत राहून त्याला धीर देते.”

“तुम्ही घेत असलेली शपथ केवळ शब्द नसून जीवनमूल्य असले पाहिजे. तुमच्या हातात जीव आहेत, मनात करुणा आणि वागण्यात शिस्त असली पाहिजे. हे तीन गुण असतील तर तुम्ही कधीच अपयशी ठरणार नाही. तुमची सेवा ही ईश्वरसेवेपेक्षा कमी नाही,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बीम्सच्या शैक्षणिक कामगिरीचा उल्लेख करत पुढील वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळावा, तसेच देशपातळीवर रँक सुधारावा, असे उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केले. तसेच संस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमास राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. बी. एल. सुजाता राठोड, बीम्सचे अधिष्ठाता व संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी, डॉ. संजय पिरापूर, शिल्पा वली, डॉ. उमेश कुलकर्णी, डॉ. इरन्ना पल्लेद, डॉ. जगदीश गनागी, उषा भंडारी, डॉ. प्रकाश कोडली यांच्यासह बीम्सचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

The post नर्सिंग हे सेवा धर्माचे प्रतीक – मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर appeared first on News 24 Tass Marathi.

बीम्स रुग्णालयात नर्सिंग अधिकाऱ्यावर हल्ला
रुग्णाने चावा घेतल्यानंतर कुटुंबीयांकडून मारहाण

घटनेच्या निषेधार्थ बीम्ससमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी

संचालकांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात एका मानसिक रुग्ण तरुणीने ड्युटीवरील नर्सिंग अधिकाऱ्याचा हात चावल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने नर्सिंग अधिकारी बसवराज कबडगी गंभीर जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ नर्सिंग कर्मचाऱ्यांनी आज बीम्ससमोर निदर्शने करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेली मानसिक रुग्ण तरुणी पिण्याच्या पाण्याच्या कारणावरून दुसऱ्या वॉर्डमध्ये गेली होती. तेथील कर्मचाऱ्यांनी तिला तिचा वॉर्ड सोडून येथे का आली, अशी विचारणा केली असता तिने शिवीगाळ केली. त्यानंतर झालेल्या वादात संबंधित तरुणीने ड्युटीवरील नर्सिंग अधिकारी बसवराज कबडगी यांचा हात चावला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. या हल्ल्यात बसवराज कबडगी यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रुग्णालयात सुमारे ३५० हून अधिक वैद्यकीय कर्मचारी रात्रंदिवस सेवा देत असताना अशा प्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी असल्याची भावना नर्सिंग अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. “सेवा देणाऱ्यांवरच हल्ले होत असतील तर आम्ही काम कसे करायचे?” असा सवाल करत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी नर्सिंग अधिकारी खादीर मुजावर यांनी केली.

घटनेची माहिती मिळताच बीम्सचे संचालक अशोक कुमार शेट्टी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले की, या प्रकरणी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांना पत्र लिहून रुग्णालयातील सुरक्षेसाठी आवश्यक संरक्षणाची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संचालकांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नर्सिंग कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. मात्र दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

The post बीम्स रुग्णालयात नर्सिंग अधिकाऱ्यावर हल्ला appeared first on News 24 Tass Marathi.

गुदमरुन मृत्यू झालेल्या तिन्ही तरुणांचे शवविच्छेदन पूर्ण
मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द

बेळगाव / प्रतिनिधी

अमन नगर परिसरात धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या तीन तरुणांचे शवविच्छेदन बुधवारी सकाळी बिम्स रुग्णालयातील शवागारात करण्यात आले. अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

या दुर्घटनेत रेहान माठे (वय २२), सरफराज हरपन्नहळ्ळी (वय २२) आणि मोईन नलबंद (वय २२) या तिघांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, घरात रात्रीच्या वेळी उब मिळावी म्हणून शेकोटीचा वापर करण्यात आला होता. मात्र, राहत्या खोलीत खिडक्या नसल्याने धूर बाहेर पडण्यास जागा नव्हती. त्यामुळे धुराचा साठा झाला आणि झोपेतच तिघांचा श्वास गुदमरल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेत शाहनवाज हरपन्नहळ्ळी याच्याही प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला असून सध्या त्याच्यावर बेळगावातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची स्थिती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

घटनेनंतर माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत असून, यासंदर्भात पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

The post गुदमरुन मृत्यू झालेल्या तिन्ही तरुणांचे शवविच्छेदन पूर्ण appeared first on News 24 Tass Marathi.

बिम्स हॉस्पिटलमधून पळून गेलेला कैदी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव / प्रतिनिधी

आजारपणामुळे बेळगावातील बिम्स हॉस्पिटलमध्ये आणले असता बाथरूमला जात असल्याचे सांगून पळून गेलेल्या पोको प्रकरणातील कैद्याला पुन्हा ताब्यात घेण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे.

बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये आजारपणामुळे आणल्यानंतर पोको प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या अनिल लंबुगोल (रा. मांजरी ता. चिक्कोडी) याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आजारपणामुळे तो बाथरूमला जात असल्याचे सांगून पळून गेला. सकाळी ८.३५ वा. पळून गेलेला अनिल दिवसभर रुग्णालयात लपला होता आणि संध्याकाळी ६ वा. पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान, सतत शोध घेत असलेल्या हिंडलगा तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्याला बेळगाव शहरातील न्यायालयाच्या आवारात पुन्हा अटक केली आणि ताब्यात घेतले.

The post बिम्स हॉस्पिटलमधून पळून गेलेला कैदी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात appeared first on News 24 Tass Marathi.

बनावट वैद्यकीय विद्यार्थीनीकडून रुग्णांवर उपचार
बीम्स हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या बीम्स रुग्णालयात एका बनावट वैद्यकीय विद्यार्थीनीने रुग्णांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

मूळची कारवार येथील सना शेख नावाची एक तरुणी स्वतःला पदव्युत्तर शिक्षणाची विद्यार्थिनी असल्याचे सांगून रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये रुग्णांवर उपचार करत होती. गेल्या तीन महिन्यांपासून ती रुग्णालयाच्या सर्जिकल वॉर्ड आणि ओपीडी विभागात फिरून वैद्यकीय सेवा देत होती. काहीवेळा कर्मचाऱ्यांना संशय आल्यावर तिने बीम्सचे संचालक अशोक शेट्टी यांचे नाव घेऊन त्यांना धमकावले, असा आरोप आहे.

दरम्यान रुग्णांवर उपचार करताना रुग्णालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या विद्यार्थीनीला रंगेहाथ पकडले. ही बाब तात्काळ बीम्स हॉस्पिटलचे सर्जन आणि आरएमओ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. विद्यार्थीनीची चौकशी केली असता, ती दुसऱ्या खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत असल्याची समजते. रुग्णालयातील एका विभागप्रमुखाच्या मदतीने ती हे कृत्य करत असल्याचे माहिती मिळाली आहे.

मात्र बीम्सचे संचालक अशोक शेट्टी यांनी या घटनेबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. एकंदरीत या घटनेमुळे बीम्सच्या प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.

The post बनावट वैद्यकीय विद्यार्थीनीकडून रुग्णांवर उपचार appeared first on News 24 Tass Marathi.

बीम्सच्या वसतिगृहात वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या
औषध प्राशन करून संपविले जीवन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील बिम्स वसतिगृहात एका वैद्यकीय विद्यार्थिनीने औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्या केलेली विद्यार्थिनी बंगळुरू येथील रहिवासी असून प्रिया कार्तिक (२७) असे तिचे आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयात रुग्ण तपासणीचा अभ्यास करणाऱ्या प्रियाने रात्री आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळले आहे.

घटनास्थळी भेट दिलेले बिम्सचे संचालक अशोक शेट्टी यांनी सांगितले की, बंगळुरू येथील वैद्यकीय विद्यार्थिनी प्रिया कार्तिक मानसिक आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे ती नैराश्यात असल्याचे कळले. तिने औषध सेवन करून आत्महत्या केली की नाही हे शवविच्छेदनानंतर कळेल. एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post बीम्सच्या वसतिगृहात वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या appeared first on News 24 Tass Marathi.

लोकायुक्तांच्या पथकाकडून उपनोंदणी ; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती
अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ

बेळगाव / प्रतिनिधी

उपनोंदणी कार्यालयाच्या कामकाजाबद्दल नेहमीच तक्रारी केल्या जातात. सध्या काहीजणांनी तक्रारी केल्यामुळे लोकायुक्त विभागाचे अधिवक्ता शुभवीर जैन यांनी बुधवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उपनोंदणी कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पाहणी केली. अचानक दाखल झालेल्या या पथकामुळे उपनोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

उपनोंदणी कार्यालयामध्ये शुभवीर जैन दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम कागदपत्राची पाहणी केली. काही अधिकारी गैरहजर होते. याबद्दल उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. त्या ठिकाणी योग्य प्रकारे नोंदी नसल्याचेही आढळून आले. काही रजिस्टरमध्ये चुकीचा उल्लेख केला होता. याबाबत त्यांनी चौकशी केली, त्यावर थातूरमातूर उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली. या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

त्यामुळे जैन यांनी तुम्ही योग्य प्रकारे व वेळेत जनतेची कामे करत नसल्यामुळे ही गर्दी आहे. तेव्हा कार्यालयाच्या वेळेत हजर राहून जनतेची कामे भ्रष्टाचार न करता करावी, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली आहे. अशोकनगरमधील मनपा कार्यालयाला भेट अशोकनगरमधील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी लोकायुक्त पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथील कागदपत्राची पाहणी करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जनतेच्या कामांचा निपटारा तातडीने करा अशी सूचना त्यांनी केली.

जिल्हा रुग्णालयात तपासणी :

लोकायुक्त अधिकारी जैन यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा रुग्णालयात भेट देऊन रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. दरम्यान, रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या सेवासुविधांबरोबरच नोंदणी पुस्तकांचीही तपासणी करण्यात आली. रुग्णांशी संवाद साधून आरोग्य व्यवस्थेची माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी बिम्स संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी रुग्णालयातील व्यवस्थेची माहिती दिली. रुग्णालयातील बाळंतिणींच्या मृत्यूबरोबरच बालमृत्यू प्रमाणासंदर्भातील माहिती जाणून घेण्यात आली.

The post लोकायुक्तांच्या पथकाकडून उपनोंदणी ; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती appeared first on News 24 Tass Marathi.