belgaum bar association Archives | News 24 Tass Marathi

ॲड. आय. एम. पाटील यांच्या विजयानिमित्त बेळगावात विजयोत्सव
बार असोसिएशनकडून फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप

वकिलांनी व्यक्त केला आनंद

बेळगाव : कर्नाटक राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीत बेळगावचे ज्येष्ठ विधिज्ञ आय. एम. पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत यश संपादन केले. त्यांच्या विजयाबद्दल बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने शहरात जल्लोषात विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बार असोसिएशनच्या सदस्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात विशेष पूजा केली. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. तसेच कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उपस्थित वकिलांनी आय. एम. पाटील यांच्या निवडीमुळे राज्यभरातील वकिलांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळेल आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रभावी प्रयत्न होतील, असा विश्वास व्यक्त केला.

विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आय. एम. पाटील यांनी निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल राज्यभरातील वकील बांधवांचे आभार मानले. “वकिलांची सेवा करण्याची मिळालेली ही संधी सार्थ ठरवत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि कल्याणासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

या विजयोत्सव कार्यक्रमाला बेळगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ वकील तसेच मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.

The post ॲड. आय. एम. पाटील यांच्या विजयानिमित्त बेळगावात विजयोत्सव appeared first on News 24 Tass Marathi.

कर्नाटक राज्य बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. आय. एम. पाटील यांचा शानदार विजय
१३ व्या क्रमांकाने निवड ; बार कौन्सिलवर बेळगावचे प्रतिनिधित्व मजबूत

बेळगाव : कर्नाटक राज्य बार कौन्सिलच्या निवडणुकीत बेळगावचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आय. एम. पाटील यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विजय मिळवला आहे. या विजयामुळे राज्याच्या विधी क्षेत्रात बेळगावचे प्रतिनिधित्व अधिक बळकट झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीच्या अंतिम निकालात ॲड. आय. एम. पाटील यांनी १३ वे स्थान मिळवत बार कौन्सिलवरील आपले स्थान निश्चित केले. बेळगाव वकील संघटनेच्या प्रमुख उमेदवारांपैकी एक असलेल्या पाटील यांच्या विजयाचे जिल्हाभरातील विधिज्ञांकडून स्वागत करण्यात आले.

या यशानंतर बेळगाव बार असोसिएशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. निकालाबाबत प्रतिक्रिया देताना संघटनेचे अध्यक्ष एस. एस. कीवडसन्नवर यांनी सांगितले की, ॲड. पाटील यांच्या निवडीमुळे बेळगाव वकील संघटनेचा सन्मान वाढला असून जिल्ह्यातील सर्व तालुका वकील संघटनांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

दरम्यान, ॲड. पाटील यांचे बंधू लिंगनगौडा पाटील यांनीही आनंद व्यक्त करत, राज्य बार कौन्सिलमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व मिळणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे सांगितले.

या निवडीमुळे वकील बांधवांच्या विविध प्रश्नांना राज्य पातळीवर अधिक प्रभावीपणे मांडता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून बेळगावच्या विधिज्ञ क्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.

The post कर्नाटक राज्य बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. आय. एम. पाटील यांचा शानदार विजय appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्हा न्यायालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा
मुख्य न्यायाधीशांसह न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बेळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात न्यायालयातील न्यायाधीश, वकील तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मंजुनाथ नायक यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वतः विविध योगासने आणि प्राणायाम करून उपस्थितांना योगाचा नियमित सराव करण्याचे आवाहन केले.

दैनंदिन जीवनातील वाढता मानसिक ताण कमी करण्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असल्याचेही सांगण्यात आले.

या प्रसंगी न्यायालयातील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी, वकील आणि कर्मचारी यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे जिल्हा न्यायालय परिसरात जागतिक योग दिनाचा सोहळा विशेष उत्साहात साजरा झाला.

The post बेळगाव जिल्हा न्यायालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

अथणीतील वकील मारहाण प्रकरणी दोषी पोलिसांच्या निलंबनाची मागणी
बेळगाव बार असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

बेळगाव : अथणी तालुक्यातील सत्ती गावात झालेल्या जातीय संघर्षानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी निष्पाप वकीलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप होत असून, या घटनेबाबत बेळगाव बार असोसिएशनने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सत्ती गावातील जातीय संघर्षानंतर बालकृष्ण क्लिनिकसमोर बसलेल्या वकील मल्लिकार्जुन कोरी यांना पोलिसांनी जमावातील व्यक्ती समजून मारहाण केल्याची घटना घडली. आपण वकील असून या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे वारंवार सांगूनही पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मारहाणीत वकिलाचा छळ झाला असून त्यांच्या व्यवसायाचाही अवमान झाल्याचे बार असोसिएशनने म्हटले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर वकिलांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राज्यात ‘वकील हिंसाचार प्रतिबंधक कायदा’ अस्तित्वात असतानाही पोलिसांकडून अशा प्रकारची घटना घडल्याबद्दल असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे.

बेळगाव बार असोसिएशनचे सरचिटणीस सचिन आर. शिवण्णावर यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित वकिलाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा बार असोसिएशनने व्यक्त केली आहे.

The post अथणीतील वकील मारहाण प्रकरणी दोषी पोलिसांच्या निलंबनाची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.

नूतन आयजीपी संदीप पाटील यांचा वकिलांच्या वतीने सत्कार
बेळगाव : उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर संदीप पाटील यांचा बेळगावमधील वकिलांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. बेळगावमध्ये आयोजित सत्कार समारंभात आयजीपी संदीप पाटील यांच्या कार्यपद्धतीचा वकिलांनी गौरव केला.

सत्कार स्वीकारल्यानंतर, आयजीपी संदीप पाटील यांनी पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांच्यातील परस्पर समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी बेळगाव वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब घोरपडे, आर. पी. पाटील, एन. आर. लातूर, मारुती कामाण्णाचे, राजू हिरेमठ, विनोद पाटील, निंगाप्पा मस्ती, मोहिते, महेंद्र कांबळे, विभूतीमठ, राजेंद्र नलवडे आणि एम. बी. बोंद्रे या ज्येष्ठ वकिलांसह अनेक वकील उपस्थित होते. उपस्थित सर्व वकिलांनी नूतन आयजीपी यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

The post नूतन आयजीपी संदीप पाटील यांचा वकिलांच्या वतीने सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीने स्वीकारला पदभार
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीने सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारत पुढील कार्यकाळाची सुरुवात केली. अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ वकील ॲड. बी. जे. गंगाई यांच्या नेतृत्वाखाली नव्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून ॲड. पवन पाटील व ॲड. जयश्री मंड्रोळी, सरचिटणीस ॲड. सचिन शिवण्णावर, खजिनदार ॲड. निर्मला पाटील, सहसचिव ॲड. प्रशांत पाटील यांचा समावेश आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. अभिषेक तारिहाळ, ॲड. जी. ए. हिरेमठ, ॲड. मल्लाप्पा होळी, ॲड. वसंत हक्केण्णावर, ॲड. दीपा मर्डी, ॲड. राजश्री पाटील व ॲड. ज्योती पट्टणशेट्टी यांनीही पदभार स्वीकारला.

यावेळी अध्यक्ष ॲड. बी. जे. गंगाई यांनी वकिलांनी दिलेल्या जबाबदारीची जाणीव व्यक्त करत ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वांना विश्वासात घेऊन काम करत वकिलांच्या समस्या सोडवण्याबरोबरच न्यायालयीन कामकाजातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

The post बेळगाव बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीने स्वीकारला पदभार appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. बी. जे. गंगाई
द्वैवार्षिक निवडणुकीत चुरशीची लढत ; नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या २०२६-२८ या कालावधीसाठी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर झाला असून, अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत ॲड. बी. जे. गंगाई यांनी विजय मिळवला आहे.

एकूण १,७०९ मतदारांनी सहभाग घेतलेल्या या निवडणुकीची मतदान प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत ॲड. गंगाई यांनी बाजी मारत पुढील दोन वर्षांसाठी नेतृत्व मिळवले.

महिला गटातून उपाध्यक्षपदासाठी ॲड. जयश्री एस. माद्रोळी यांनी ८७९ मते मिळवत मोठा विजय संपादन केला. जनरल सेक्रेटरी पदावर ॲड. सचिन शिवन्नावर, जॉईंट सेक्रेटरी पदावर ॲड. प्रशांत पाटील, तर खजिनदार पदावर ॲड. निर्मला पाटील विजयी झाले.

मॅनेजमेंट कमिटीच्या चार जागांसाठी ॲड. अभिषेक तारीहाळ (८७५), ॲड. जी. ए. हिरेमठ (६४४), ॲड. मल्लप्पा होळी (६४१) आणि ॲड. वसंत अक्केनावर (६२७) यांनी विजय मिळवला. तर दीपा मर्डी, राजेश्वरी पाटील आणि ज्योती पट्टणशेट्टी या महिला सदस्य आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या.

निवडणूक अधिकारी डी. ए. तिगडी आणि आर. एन. मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. सायंकाळी ६.३० वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

The post बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. बी. जे. गंगाई appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव बार असोसिएशनची २४ मार्चला सर्वसाधारण सभा
निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी आणि आर्थिक विषयांवर होणार सविस्तर चर्चा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा येत्या मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स येथील ॲडव्होकेट समुदाय भवनाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व वकील सदस्यांनी केएसबीसी अथवा बार असोसिएशनने जारी केलेले ओळखपत्र सोबत घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या सभेत २०२६ ते २०२८ या कालावधीसाठीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होऊन निवडणुकीची घोषणा व कार्यक्रमपत्रिका निश्चित केली जाणार आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या मतदार यादीवर चर्चा करून ती अंतिम करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यासोबतच २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी हिशेबांची तपासणी करण्यासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती करण्याचाही विषय चर्चेला ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, ३११ सदस्यांनी सादर केलेल्या विनंतीनुसार वयोमर्यादा आणि वार्षिक वर्गणीसंदर्भातील सुधारित उपविधींचा आढावा घेण्याबाबतही विचारविनिमय होणार आहे. तसेच २५ वर्षांचा वकिलीचा अनुभव पूर्ण केलेल्या इच्छुक सदस्यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम करण्यासाठी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सरचिटणीस ॲड. वाय. के. दिवटे यांनी केले आहे.

The post बेळगाव बार असोसिएशनची २४ मार्चला सर्वसाधारण सभा appeared first on News 24 Tass Marathi.

ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्यावरील अविश्वास ठराव रद्द
कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय ; बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपद कायम

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्यावरील अविश्वास ठराव कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने रद्दबातल ठरवला आहे. या निकालामुळे ॲड. किवडसन्नावर पुढेही बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

गेल्या २० सप्टेंबर २०२५ रोजी किवडसन्नावर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाला आव्हान देत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान ॲड. किवडसन्नावर यांच्यावतीने ॲड. विजयकुमार शीलवंत, तर बार असोसिएशनतर्फे ॲड. नयना निर्ली यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने अविश्वास ठराव अवैध ठरवत तो रद्द केला.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, बेळगाव न्यायालयात काही बोगस वकील प्रॅक्टिस करत असल्याच्या तक्रारीवर अध्यक्षांनी कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या मुद्द्यावरून ४५५ वकिलांनी अविश्वास ठरावाची मागणी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष सर्वसाधारण सभा घेऊन मतदान झाले होते आणि उपाध्यक्ष ॲड. बसवराज मुगळी यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र, आता उच्च न्यायालयाने ही संपूर्ण प्रक्रिया रद्द ठरवत अविश्वास ठराव बाद केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर किवडसन्नावर यांच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात आनंदोत्सव साजरा केला. मंगळवारी सकाळी बेळगाव न्यायालयात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ॲड. किवडसन्नावर म्हणाले की, न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व आक्षेप दूर करून पुन्हा एकदा वकील बांधवांची सेवा करण्याची संधी दिली आहे. सर्व वरिष्ठ व सहकारी वकिलांना विश्वासात घेऊन बेळगाव बार असोसिएशनच्या १५० व्या वर्धापन दिनाच्या तयारीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी या निकालासाठी सर्व सहकारी व वरिष्ठ वकिलांचे आभारही मानले.

The post ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्यावरील अविश्वास ठराव रद्द appeared first on News 24 Tass Marathi.