b. k. model centenary Archives | News 24 Tass Marathi

देशाचे उज्वल भवितव्य शिक्षकांच्या हाती
ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांचा विश्वास

बेळगाव : शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञानच देत नसून, भावी पिढी आणि देशाचे भवितव्य घडविण्याचे काम करत असतात असे प्रतिपादन ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी बोलताना केले.

आज शुक्रवारी सायंकाळी कॅम्प येथील बी.के मॉडल हायस्कूलच्या शताब्दी समारोहाच्या समारोप समारंभाराला, मराठा लष्करी प्रशिक्षण केंद्राचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्यासह सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक नागथीहळी चंद्रशेखर तसेच बेळगावच्या जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ब्रिगेडियर मुखर्जी म्हणाले, चांगल्या शिक्षणातून आजचे विद्यार्थी उद्या देशाचे सुजाण नागरिक बनणार आहेत. यांना घडविताना शिक्षकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून द्यावी. आजच्या जगात युद्धनीती ही बदलली आहे. याचा प्रत्यय आपणाला ऑपरेशन सिंदूर मध्ये पाहायला मिळाला. आज जगभरात युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. याचा विचार केल्यास शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची चांगली ओळख करून द्यावी. आजच्या युगात सायन्स टेक्नॉलॉजी महत्त्वाची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागथीहळी चंद्रशेखर म्हणाले ,अनेक कार्यक्रमात भाग घेत असतो. मात्र बेळगावात आल्यानंतर एक वेगळेच समाधान आणि आनंद मिळतो .आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, संचालक यांच्यामधील उत्साह पाहून प्रभावित झालो आहे. शाळेने १०० वर्षे पूर्ण केल्याचा मलाही निश्चित अभिमान आहे. मी स्वतःही ज्या सरकारी शाळेत शिकलो त्या शाळेचा या यावर्षी शतक महोत्सव साजरा होत आहे. हा एक योगायोग आहे .असे सांगतानाच त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील आणि सिनेसृष्टीतील अनुभव सांगितले. जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनीही यावेळी समयोचीत विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्रीनिवास शिवणगी यांनी आभार मानले.आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

The post देशाचे उज्वल भवितव्य शिक्षकांच्या हाती appeared first on News 24 Tass Marathi.

बी. के. मॉडेलच्या माजी विद्यार्थ्यांकडून भेटवस्तू अर्पण
बेळगाव / प्रतिनिधी

बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त 1989 च्या माजी विद्यार्थी समूहाच्या वतीने शाळेला भेटवस्तू अर्पण करण्यात आली. शालेय कामकाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या संगणकीय सामग्रीचे संच शाळेला देण्यात आले.उपेंद्र बाजीकर यांच्या नेतृत्वाखाली माजी विद्यार्थी समूहाने ही भेटवस्तू शाळेला अर्पण केली. शाळेचे मुख्याध्यापक एस. एन. जोशी यांच्याकडे ही भेटवस्तू देण्यात आली. यावेळी बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पोतदार, सचिव श्रीनिवास शिवणगी, शताब्दी महोत्सव समितीचे पदाधिकारी के बी हुनगुंद, शैलजा चाटे या मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले. शाळेचे माजी विद्यार्थी सुधीर मेलगे, नितीन हुळबत्ते, गजानन गोवेकर, महेश भिसे, दिनेश शिरोळकर,भरत पोरवाल,रमेश जैन माधव पाटील, श्रीकांत हुंदळेकर, सतीश पाटील यांची उपस्थिती होती.

The post बी. के. मॉडेलच्या माजी विद्यार्थ्यांकडून भेटवस्तू अर्पण appeared first on News 24 Tass Marathi.

बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सवाचा उद्या समारोप
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शतकमहोत्सवाचा समारोप उद्या शुक्रवार, दि. २६ डिसेंबर रोजी विशेष समारंभाने होणार आहे. या समारोप सोहळ्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक नागथिहळ्ळी चंद्रशेखर आणि भारतीय सैन्याचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नागथिहळ्ळी चंद्रशेखर हे कन्नड चित्रपटसृष्टीतील अत्यंत आदरणीय नाव असून दिग्दर्शक, पटकथालेखक व अभिनेते म्हणून त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. वास्तववादी कथानक, मानवी नातेसंबंध आणि सामाजिक जाणिवांची संवेदनशील मांडणी ही त्यांच्या चित्रपटांची ओळख आहे. अमेरिका अमेरिका, माथाड माथाडू मल्लिगे, कोट्रेशी कनसिन मल्ले यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षक व समीक्षकांची विशेष दाद मिळाली असून त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक कर्नाटक राज्य पुरस्कार लाभले आहेत.

ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी हे सध्या द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट म्हणून कार्यरत आहेत. शिस्त, नेतृत्व, राष्ट्रभक्ती आणि युवकांमध्ये देशसेवेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे.

या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे समारोप सोहळा अधिक प्रेरणादायी ठरणार असून विद्यार्थ्यांना कला, संस्कृती, शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रसेवा या विषयांवर मौल्यवान मार्गदर्शन मिळणार आहे. या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी केले आहे.

The post बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सवाचा उद्या समारोप appeared first on News 24 Tass Marathi.

‘गुगल’,’एआय’ कडून मिळणारी माहिती म्हणजे ‘ज्ञान’ नव्हे
अभिनेते गिरीश ओक यांचे प्रतिपादन

बेळगाव / प्रतिनिधी

“गुगल किंवा एआयकडून मिळणारी माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञानासाठी अनुभव, संवेदना आणि विचारशीलता आवश्यक असते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी केले. आज सायंकाळी कॅम्प येथील बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार संजय पाटील प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी गिरीश ओक पुढे म्हणाले की, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाच ज्ञानेंद्रियांचा योग्य वापर झाला नाही, तर सहावे इंद्रिय म्हणजे सर्जनशील बुद्धी निष्क्रिय होते. एआय स्वतःहून कलाकृती निर्माण करू शकत नाही किंवा शस्त्रक्रिया करू शकत नाही; त्यामागे माणसाची सर्जनशील बुद्धीच कार्यरत असते. मात्र तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे ही सर्जनशीलता आणि जिज्ञासा मुलांमध्ये कमी होत चालल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

आजच्या काळात पालक आणि शिक्षकांची जबाबदारी अधिक वाढली असून, मुलांशी संवाद साधणे, बाहेरील जग दाखवणे आणि अनुभवातून शिकण्यास प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “मी जे काही आहे, ते माझ्या आई-वडील आणि शिक्षकांमुळेच,” असे नमूद करत त्यांनी बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शंभर वर्षांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.

यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त करताना, शिक्षणाबद्दल अनास्था असलेल्या काळात बी. के. मॉडेल शाळेची स्थापना करणाऱ्या संस्थापकांचे धाडस आणि शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले. भाषा संवादासाठी असते, वादासाठी नव्हे, असे सांगत शाळेने “माणूस घडवण्याचे” कार्य केल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी स्वागत केले, तर शेवटी श्रीनिवास शिवणगी यांनी आभार मानले.

The post ‘गुगल’,’एआय’ कडून मिळणारी माहिती म्हणजे ‘ज्ञान’ नव्हे appeared first on News 24 Tass Marathi.

बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्यात उद्या अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचा विशेष सहभाग
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील प्रतिष्ठित बी. के. मॉडेल स्कूलमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमात मराठी चित्रपट, नाटक व दूरदर्शन क्षेत्रातील ज्येष्ठ व बहुआयामी अभिनेते डॉ. गिरीश ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांसह कला रसिकांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.

नागपूर येथे जन्मलेले डॉ. गिरीश ओक यांनी आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असले, तरी कलेवरील ओढीमुळे त्यांनी वैद्यकीय व्यवसायाऐवजी अभिनय क्षेत्राची वाट निवडली. १९८४ पासून त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली असून, त्यांनी आजवर ४० हून अधिक नाटकं, ४० पेक्षा जास्त चित्रपट आणि अनेक लोकप्रिय दूरदर्शन मालिकांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.

रंगभूमीवर ‘यू टर्न’, ‘टू मी नवेच’, ‘दीपस्तंभ’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपट क्षेत्रात ‘जसा बाप तशी पोर’, ‘सातच्या आत घरात’, ‘कॉर्पोरेट’ (हिंदी), ‘हॅलो! गंधे सर’, ‘तू ही रे’, ‘जुनं फर्निचर’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी लक्षवेधी भूमिका केल्या असून, आगामी ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातही ते झळकणार आहेत.

दूरदर्शनवर ‘अग्गबाई सासूबाई’, ‘अग्गबाई सुनबाई’, ‘जुलून येती रेशीमगाठी’, ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

दीर्घ आणि यशस्वी अभिनय कारकिर्दीबद्दल डॉ. गिरीश ओक यांना झी मराठी उत्सव नाट्यांचा जीवनगौरव पुरस्कार तसेच झी नाट्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अभिनयाबरोबरच ते कविता व लेखनातही सक्रिय असून, त्यांच्या साहित्यिक लेखनातून सामाजिक व जीवनविषयक जाणिवा व्यक्त होतात.

बी. के. मॉडेल स्कूलच्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कला, संस्कृती आणि जीवनप्रवासाबाबत प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

The post बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्यात उद्या अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचा विशेष सहभाग appeared first on News 24 Tass Marathi.

निरंतर शिकत राहणे गरजेचे
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांचे प्रतिपादन

बेळगाव / प्रतिनिधी

स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी निरंतर शिकत राहणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण एकदा हातून सुटले की ते पुन्हा मिळवणे कठीण होते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केले.

कॅम्प येथील बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव सप्ताहात बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सचिन पिळगावकर म्हणाले की, माझे बालपण गरिबीत गेले. लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली आणि त्यामुळे उच्च शिक्षण पूर्ण करता आले नाही. मात्र शिक्षकांनी माझ्या शिक्षणासाठी विशेष मेहनत घेतली. शिक्षणाचे महत्त्व मला आयुष्यभर जाणवत राहिले. त्यामुळे प्रत्येकाने वय, परिस्थिती किंवा व्यवसाय काहीही असो, शिकणे कधीही थांबवू नये.

चित्रपटसृष्टीबद्दल बोलताना ते म्हणाले की, लोकांना या क्षेत्रातील झगमगाट दिसतो ; मात्र त्यामागील कष्ट, शिस्त आणि सतत शिकण्याची गरज दिसत नाही. मी अभिनय करत असतानाच भाषांचे ज्ञान, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाबी शिकत राहिलो. मीनाकुमारी यांच्यामुळे मला उर्दू शिकण्याची संधी मिळाली. भाषा आणि ज्ञानावरचे प्रेम मला आजही पुढे नेत आहे.

स्त्री शिक्षणावर भर देत ते म्हणाले की, स्त्रिया सर्वार्थाने सक्षम असून पालकांनी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. योग्य वयात योग्य गोष्टी शिकणे आणि स्वतःला सतत समृद्ध करणे हाच यशाचा खरा मार्ग आहे.

आमदार राजू शेठ यांनी शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षक समाज घडविण्याचे आणि राष्ट्र उभारणीचे कार्य करतात, असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

The post निरंतर शिकत राहणे गरजेचे appeared first on News 24 Tass Marathi.

बी. के. मॉडेल हायस्कूलचे शैक्षणिक योगदान गौरवास्पद ; डॉ. मीना चंदावरकर
बेळगाव / प्रतिनिधी

स्पर्धा, तंत्रज्ञान आणि वेगाने बदलणाऱ्या काळात केवळ गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांना विचारशील, आत्मविश्वासू आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे मोलाचे कार्य बी. के. मॉडेल हायस्कूलने गेल्या शंभर वर्षांत केले आहे. याच भक्कम शैक्षणिक पायावर घडलेले विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ व कर्नाटक विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर यांनी केले.

बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व सेंद्रिय शेतीतज्ज्ञ के. ई. एन. राघवन यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. चंदावरकर यांनी सांगितले की, शिक्षण ही केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित प्रक्रिया नसून योग्य वातावरण, प्रेरणादायी शिक्षक आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. बी. के. मॉडेल हायस्कूलने ही मूल्याधिष्ठित शिक्षणपरंपरा कायम जपली आहे. इच्छाशक्ती, ज्ञान आणि उत्साह या त्रिसूत्रीवर आधारित शिक्षणपद्धती हीच या संस्थेची खरी ओळख ठरली आहे.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेला दिलेले महत्त्व या शाळेने अनेक वर्षांपूर्वीच अमलात आणले असल्याचे त्यांनी नमूद केले. इंग्रजीसह कन्नड आणि मराठी भाषांना समान महत्त्व देत विद्यार्थ्यांना भाषिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे कार्य शाळेत प्रभावीपणे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

शाळेच्या शतकपूर्तीमागे शिक्षकांचा त्याग, संचालकांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि संस्थेची मूल्यनिष्ठ परंपरा कारणीभूत असल्याचे सांगत त्यांनी सर्व घटकांचे विशेष कौतुक केले. यावेळी के. ई. एन. राघवन यांनीही शिक्षण व समाज यांच्यातील सुसंवादावर भर देत आपले विचार मांडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शुक्लांबर पत्तार यांनी स्वागतगीत सादर केले. श्रीनिवास शिवणगी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी आभारप्रदर्शन केले.

The post बी. के. मॉडेल हायस्कूलचे शैक्षणिक योगदान गौरवास्पद ; डॉ. मीना चंदावरकर appeared first on News 24 Tass Marathi.

बी. के. मॉडेल हायस्कूल शताब्दी सोहळ्यात उद्या सचिन पिळगावकर यांची विशेष उपस्थिती
बुधवारी बेळगावात कलाप्रेमींसाठी पर्वणी ; कार्यक्रम सर्वांसाठी खुला

बेळगाव : येथील प्रतिष्ठित बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर उद्या बुधवार दि. २४ डिसेंबर रोजी बेळगावात येणार आहेत. शाळेच्या भव्य मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या वेळी सचिन पिळगावकर विद्यार्थ्यांशी व उपस्थितांशी थेट संवाद साधणार असून, अभिनय, दिग्दर्शन, सिनेसृष्टीतील करिअरच्या संधी तसेच मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीवर ते आपले अनुभव कथन करणार आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन व संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

बी. के. मॉडेल हायस्कूलला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सात दिवसीय शताब्दी महोत्सवात विविध नामवंत व्यक्ती सहभागी होत आहेत. सचिन पिळगावकर यांच्यासारख्या अष्टपैलू कलाकाराच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील नवे आयाम समजण्याची संधी मिळेल, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमाला बेळगावमधील विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच कलाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी केले आहे.

थोडक्यात परिचय :

सचिन पिळगावकर यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवाबनवी, एकापेक्षा एक, नवरा माझा नवसाचा, कट्यार काळजात घुसली हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट असून, शोले, सत्ते पे सत्ता, नदिया के पार यांसारख्या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. अभिनय व दिग्दर्शनासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

The post बी. के. मॉडेल हायस्कूल शताब्दी सोहळ्यात उद्या सचिन पिळगावकर यांची विशेष उपस्थिती appeared first on News 24 Tass Marathi.

भावी पिढी घडवण्यात शिक्षकांइतकीच पालकांची भूमिका महत्त्वाची
खासदार जगदीश शेट्टर यांचे प्रतिपादन

बी. के. मॉडेल हायस्कूल शतक महोत्सव

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन जितके महत्त्वाचे आहे, तितकीच पालकांची भूमिका निर्णायक ठरते. मुलांवर अपेक्षांचे ओझे न टाकता त्यांना स्वतःच्या आवडी-निवडींनुसार आयुष्याची दिशा ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केले.

कॅम्प येथील बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. गुरुराज करजगी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

खासदार शेट्टर पुढे म्हणाले की, बी. के. मॉडेल हायस्कूलने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता सामाजिक जाणीव, संस्कृती आणि परंपरेची मूल्ये रुजवली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यामुळेच या शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी ठरले आहेत. शिक्षकांबरोबरच पालकांनीही मुलांच्या मतांचा आणि आवडीचा आदर करावा. आपली मते मुलांवर लादू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षक व पालकांनी मिळून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ. गुरुराज करजगी म्हणाले की, आजची पिढी मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या निर्जीव साधनांमध्ये अधिक गुंतत चालली आहे. यामुळे मानवी नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. शिक्षण केवळ गुणांपुरते मर्यादित राहू नये. शिक्षकांनी नोकरी म्हणून नव्हे, तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अध्यापन करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या मुलांसारखे पाहावे आणि पालकांनी शिक्षकांशी सातत्याने संवाद साधावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीनिवास शिवणगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या शेवटी बी. के. मॉडेल हायस्कूल, श्रीधर कुलकर्णी उषाताई गुप्ते हायस्कूल तसेच प्रभाकर शहापूरकर यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

The post भावी पिढी घडवण्यात शिक्षकांइतकीच पालकांची भूमिका महत्त्वाची appeared first on News 24 Tass Marathi.

गौरवशाली शिक्षण परंपरेच्या बळावर भारत विकसित व शक्तिशाली राष्ट्र ; केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
बेळगाव : भारताला लाभलेल्या प्राचीन व गौरवशाली शिक्षण परंपरेच्या बळावरच आज देश विकसित आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून जागतिक पातळीवर पुढे येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले.

कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार व केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, साहित्यिक बसवराज जगजंपी, शाळेचे माजी विद्यार्थी जयंत देशपांडे तसेच माजी आमदार संजय पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री जोशी पुढे म्हणाले की, ब्रिटिशांनी देशावर गुलामगिरी लादताना भारतीयांच्या मनात न्यूनगंड निर्माण केला. भारताची ओळख गरीब व अज्ञानी अशी बनवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही ओळख पुसली जात असून, भारतीयांच्या मनातील न्यूनगंड दूर करण्याचे कार्य सुरू आहे. भारताला आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, वराहमिहिर, चरक व सुश्रुत यांसारख्या महान विद्वानांची परंपरा लाभली आहे. ऋषीमुनींच्या ज्ञानामुळे भारताने जगाला मानवतेचे धडे दिले, असे त्यांनी नमूद केले.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणतेही ‘केसरीकरण’ नसून, त्यामध्ये भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचे प्रतिबिंब दिसून येईल. याच ज्ञानशक्तीच्या आधारावर भारत आज जगातील चौथी आर्थिक शक्ती बनला आहे, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले की, ब्रिटिश काळात बेळगाव हे प्रशासकीय मुख्यालय असल्याने येथे अनेक मिशनरी शाळा सुरू होत्या. त्या काळात शिक्षण देणे व घेणे अत्यंत कठीण होते. अशा परिस्थितीत ध्येयवादी शिक्षक आणि दानशूर व्यक्तींनी सुरू केलेल्या शाळांपैकी बी. के. मॉडेल हायस्कूलने गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे.

कार्यक्रमात बसवराज जगजंपी यांनीही आपले विचार मांडले. या शताब्दी सोहळ्यासाठी शाळेचे आजी-माजी विद्यार्थी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

The post गौरवशाली शिक्षण परंपरेच्या बळावर भारत विकसित व शक्तिशाली राष्ट्र ; केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी appeared first on News 24 Tass Marathi.