Awareness Archives | News 24 Tass Marathi

श्री शिवबसव ज्योतीतर्फे तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती
बेळगाव : जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त सह्याद्रीनगर येथील श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी तंबाखू निषेधाच्या निमित्ताने निषेधाच्या पार्श्वभूमीवर पोस्टर आणि बॅनरचे प्रदर्शन मांडले होते. यामधून जनजागृती करण्यात आली. तसेच आसपासच्या परिसरात जागृती फेरी काढून नागरिकांना तंबाखू निषेधाचे आवाहन करण्यात आले. तंबाखू, गुटखा तसेच सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहावे असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन आधार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. डी. टी. बामणे यांच्याहस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रम संयोजनासाठी डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. पी. जयमोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी वर्गाने परिश्रम घेतले.

The post श्री शिवबसव ज्योतीतर्फे तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती appeared first on News 24 Tass Marathi.

शिवानंद महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता, जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण
कागवाड : पर्यावरण संवर्धनाची काळाची गरज ओळखून येथील शिवानंद महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालय परिसर स्वच्छता, पर्यावरण जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एनसीसी कॅडेट्सनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्ती याविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणांसह परिसरातून फेरी काढली. या फेरीला विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट अशोक आर. आलगोंडी यांनी उपस्थितांचे स्वागत करून जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार यांच्याहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती या समस्यांमागे मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.” त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही केले.

कार्यक्रमास डॉ. चंद्रशेखर वाय., एनएसएस कार्यक्रम अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात महाविद्यालयातील ५० हून अधिक एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याची शपथ घेतली. पर्यावरण संरक्षणाचा दृढ संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. पर्यावरण रक्षणाचा संकल्प आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

The post शिवानंद महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता, जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण appeared first on News 24 Tass Marathi.

महात्मा फुले यांच्या तृतीय रत्न नाटकाचे विश्लेषण
जागर विवेकाचा कार्यक्रमात अनिल आजगावकर यांचे व्याख्यान

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या प्रेरणेने व प्रगतिशील लेखक संघ आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बेळगांव शाखा यांच्यातर्फे बुधवारी झालेल्या जागर विवेकाचा कार्यक्रमात कॉ. अनिल आजगावकर यांचे महात्मा फुलेंचे नाटक तृतीय रत्न यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर अध्यक्षस्थानी होते.

इंद्रजित मोरे यांनी प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह जोतिबा अगसीमनी यांच्या हस्ते व्याख्याते व अध्यक्ष यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

अनिल आजगावकर यांनी आपल्या व्याख्यानात प्रारंभी महात्मा फुले यांचा जीवन परिचय व त्यांचे कार्य यांची माहिती दिली. नाटकावर बोलताना त्यांनी इंग्रजी उर्दू हिंदी नाटककारांच्या नाटकांचा संदर्भ दिला. तिसरे रत्न या नाटकात फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. तसेच अंधश्रद्धा यावरही भाष्य केले आहे, असे सांगितले.

कृष्णा शहापूरकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, नाटक हे केवळ मनोरंजनाचेच नव्हे तर प्रबोधनाचे माध्यम बनले आहे. महात्मा फुले यांच्या नंतरच्या आचार्य अत्रे, अभिराम भडकमकर यांच्यासारख्या अनेक नाटककारांनी आपल्या नाटकांतून अंधश्रद्धावर प्रहार केले आहे. २१वे शतक हे विज्ञानाचे शतक मानले जाते. पण आज अंधश्रद्धा कमी होण्याऐवजी वाढली आहे. लोकांमध्ये ज्यांनी वैज्ञानिक दृष्टी रुजवायची आहे तेच वैज्ञानिक आपण तयार केलेल्या उपग्रह अवकाशात सोडण्यापूर्वी पूजा करतात. मग सामान्यांनी काय धडा घ्यायचा असा प्रश्न उपस्थित होतो. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणे ही आजची खरी गरज आहे.

जोतिबा अगसीमनी यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

The post महात्मा फुले यांच्या तृतीय रत्न नाटकाचे विश्लेषण appeared first on News 24 Tass Marathi.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान; ४८ जणांवर दंडात्मक कारवाई
तंबाखू नियंत्रण कक्षाची शहापूरमध्ये धडक मोहीम

शाळा परिसरात तंबाखू विक्रीवर निर्बंध

बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे तसेच अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि पोलीस विभागाने शहापूर परिसरात संयुक्त कारवाई करत ४८ जणांवर दंडात्मक कारवाई केली.

मंगळवारी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत ‘कोटपा-२००३’ कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे आणि शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानदारांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण ४८ गुन्हे नोंदवून संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला.

कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना इशारा देत दंड आकारण्यात आला. तसेच तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो, याबाबत जनजागृतीही करण्यात आली.

ही मोहीम जिल्हा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये राज्य तंबाखू नियंत्रण युनिटचे विभागीय समन्वयक महंतेश उल्लागडी, सामाजिक कार्यकर्त्या कविता राजन्नावर, आरोग्य केंद्राचे सतीश सज्जन आणि पोलीस अधिकारी विठ्ठल बिदारी यांच्यासह पथकातील अन्य सदस्य सहभागी झाले होते.

The post सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान; ४८ जणांवर दंडात्मक कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

सायबर फसवणुकीपासून सावध राहा
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

“आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहणे आपल्या सजगतेवर अवलंबून आहे. कोणत्याही आमिष किंवा भीतीला बळी न पडता, ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहावे,” असे आवाहन बेळगाव पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे (IPS) यांनी केले.

शनिवारी, २८ मार्च रोजी टिळकवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या श्री सामर्थ्य मंदिर हॉल येथे ‘बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ’ आणि ‘बेळगाव शहर सायबर क्राईम विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईम जनजागृती सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमात पोलीस आयुक्तांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

पोलीस आयुक्तांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार जसे की ओटीपी फ्रॉड, डिजिटल अरेस्टची भीती, लॉटरी स्कॅम आणि बनावट केवायसी अपडेट्स याबाबत सोप्या भाषेत माहिती दिली. त्यांनी संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, तसेच सुरक्षिततेचे नियम पाळा, असे आवाहन केले. याशिवाय, पीएसआय सुमन पवार यांनी तांत्रिक सुरक्षिततेसंदर्भातील मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात मानद सचिव श्री. सुरेंद्र देसाई यांच्या स्वागत भाषणाने झाली, तर एसीपी (सायबर क्राईम) श्री. मंतूर यांनी प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष श्री. विश्वास धुराजी यांनी पोलीस आयुक्त व इतर अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. या वेळी मीडिया पॉवर प्रेसचे मालक श्री. संदीप देसाई यांनी पोलीस आयुक्तांचा विशेष सत्कार केला.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून वरिष्ठ पत्रकार श्री. प्रसाद प्रभू यांनी सायबर गुन्हेगारीची सद्यस्थिती व ज्येष्ठांनी घ्यावयाची खबरदारी यावर मार्गदर्शन केले. एसीपी (सायबर क्राईम) श्री. मंतूर, सायबर क्राईम पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी, व टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय पीआरओ श्री. विकास कलघटगी यांनी केले, तर संघाचे अध्यक्ष श्री. विश्वास धुराजी यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईल बँकिंग व सायबर सुरक्षा बाबत प्रश्न विचारले. पोलीस आयुक्तांनी सर्व शंकांचे निरसन केले. मानद सह-सचिव श्री. शिवराज पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. चहा व अल्पोपहारानंतर सभा यशस्वीपणे संपली.

The post सायबर फसवणुकीपासून सावध राहा appeared first on News 24 Tass Marathi.

श्रीशिवबसव ज्योती कॉलेजतर्फे स्वच्छता विषयक जागृती अभियान
बेळगाव / प्रतिनिधी

आधार शिक्षण संस्था संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या वतीने स्वच्छता आणि आरोग्य जागृती विषयक उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना कचरा निर्मूलन योग्य रीतीने करावे तसेच कचरा साचून राहणार नाही याची दक्षता घेण्याचे महत्त्व सांगण्यात आले.

याकरिता विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले. आश्रय कॉलनी, सारथीनगर, सह्याद्रीनगर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कचरा साचून राहिल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.यामधून आजार उद्भवतात. अशावेळी नागरिकांनी प्रारंभापासून कचऱ्याच्या संकटापासून मुक्त रहावे असे मार्गदर्शन करण्यात आले. या जागृती मोहिमेमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फलक हाती घेऊन जागृती केली. हॉस्पिटल मधील ऑर्गेनॉन आणि कम्युनिटी मेडिसिन विभागाने संयुक्तरीत्या हा उपक्रम राबविला. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संयोजन आधार शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राचार्य डॉ. डी. टी. बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. उपक्रमाचे संयोजन डॉ.सेबेस्टियन डिसोजा यांच्यासह डॉ. झाकीर हुसेन मुजावर, डॉ. सबिहा रंगरेज डॉ. मनीषा यांनी केले होते.

The post श्रीशिवबसव ज्योती कॉलेजतर्फे स्वच्छता विषयक जागृती अभियान appeared first on News 24 Tass Marathi.

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी उद्या जनजागृती सभा
बेळगाव / प्रतिनिधी

सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असल्याने, त्याबाबत जनजागृती करणे व नागरिकांनी योग्य सावधगिरी बाळगावी यासाठी बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटी आणि पोलीस आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार, २८ मार्च रोजी जनजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील सामर्थ्य मंदिर सभागृहात (बालिका आदर्श विद्यालयाजवळ) सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे आणि सायबर गुन्हा शाखेचे सहायक पोलिस आयुक्त श्री मंतेरो मार्गदर्शन करतील.

सभेतील चर्चेत ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणूक, फिशिंग आणि अन्य ऑनलाईन दहशतवादापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती दिली जाईल. सभेच्या अध्यक्ष विश्वास धुराजी यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

The post सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी उद्या जनजागृती सभा appeared first on News 24 Tass Marathi.

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी शनिवारी जनजागृती सभा
बेळगाव / प्रतिनिधी

सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असल्याने, त्याबाबत जनजागृती करणे व नागरिकांनी योग्य सावधगिरी बाळगावी यासाठी बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटी आणि पोलीस आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २८ मार्च रोजी जनजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील सामर्थ्य मंदिर सभागृहात (बालिका आदर्श विद्यालयाजवळ) सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे आणि सायबर गुन्हा शाखेचे सहायक पोलिस आयुक्त श्री मंतेरो मार्गदर्शन करतील.

सभेतील चर्चेत ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणूक, फिशिंग आणि अन्य ऑनलाईन दहशतवादापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती दिली जाईल. सभेच्या अध्यक्ष विश्वास धुराजी यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

The post सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी शनिवारी जनजागृती सभा appeared first on News 24 Tass Marathi.

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘बाल संरक्षण कायदा’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल (कॅम्प, बेळगाव) येथे ‘बाल संरक्षण कायदे’ या विषयावर विशेष माहिती कार्यक्रम उत्साहात पार पडला.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सौदामिनी सावंत यांनी केले. यावेळी शालेय शिक्षकांनीच ‘संसाधन व्यक्ती’ (Resource Persons) म्हणून जबाबदारी सांभाळत विद्यार्थ्यांना कायद्याची सखोल माहिती दिली.

यामध्ये श्रीमती मुक्ता लोहार यांनी ‘बाल तस्करी’ (Child Trafficking), श्रीमती आरती चिंगळी यांनी ‘पोक्सो कायदा’ (POCSO Act), श्रीमती अश्विनी चकडे यांनी ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ आणि श्रीमती शीला गेज्जी यांनी ‘बालकामगार प्रतिबंध’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला बालवाटिका शिक्षिका श्रीमती काजल बांदेकर, संगीत शिक्षिका श्रीमती अक्षता मोरे तसेच शालेय क्लर्क श्रीमती राजश्री पागा यांचे सहकार्य लाभले.

केवळ व्याख्यानेच नव्हे तर, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विशेष व्हिडिओ दाखवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती सौदामिनी सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या हक्कांबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल मोठी जागृती निर्माण झाली आहे.

The post ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘बाल संरक्षण कायदा’ जनजागृती कार्यक्रम संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.

बाल हक्क आणि कायद्याविषयी ७ मार्च रोजी व्यापक जनजागृती
सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांची माहिती

एकाचवेळी १२०० शाळांत राबविणार मोहीम

बेळगाव / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव शालेय वयातच व्हावी आणि कायद्याविषयी भीतीऐवजी समज निर्माण व्हावी, या उद्देशाने बेळगाव जिल्ह्यात ७ मार्च रोजी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे १२०० माध्यमिक शाळांमध्ये एकाच वेळी बाल हक्क आणि संबंधित कायद्यांवर मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, टिळकवाडी येथील केएलएस संस्थेत या उपक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती जयंत बॅनर्जी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर जिल्हाभरातील शाळांमध्ये पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंध आणि बालकामगारविरोधी कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली जाईल.

या मोहिमेसाठी ६५ न्यायाधीश, ज्येष्ठ वकील व स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली असून ते प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. कायद्याविषयी मूलभूत समज वाढवणे आणि तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेची माहिती देणे, यावर विशेष भर राहणार आहे.

याशिवाय १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार असून सुमारे २८ हजार प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी ८५ पीठे कार्यरत राहतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या ९० दिवसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत सामंजस्यातून प्रलंबित खटले कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नायक यांनी सांगितले.

The post बाल हक्क आणि कायद्याविषयी ७ मार्च रोजी व्यापक जनजागृती appeared first on News 24 Tass Marathi.