award ceremony Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव महाराष्ट्राच्या अस्मितेचे धगधगते हृदय
प्रा. सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन

राजारामबापू पाटील ललित कला अकादमीतर्फे पुरस्कार वितरण

बेळगाव : संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ठिणगी बेळगावच्या साहित्य संमेलनातून पडली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे बेळगाव कर्नाटकचे असल्याचे आम्ही कधीही मानत नाही. बेळगाव हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे धगधगते हृदय असून, येथील मराठी भाषिकांनी संघर्षातून भाषा आणि चळवळ जिवंत ठेवली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

राजारामबापू पाटील ललित कला अकादमी महाराष्ट्र राज्य आणि शब्दगंध कविमंडळ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान २०२६’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे झाला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा. लवटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. अकादमीचे निमंत्रक प्रा. प्रदीप पाटील तसेच शब्दगंध कविमंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी यांनी प्रास्ताविक केले. माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि प्रा. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

प्रा. लवटे म्हणाले, भाषा नष्ट झाली तर संस्कृतीही नष्ट होते. त्यामुळे भाषा जपणे अत्यंत आवश्यक आहे. राजारामबापू पाटील ललित कला अकादमीच्या माध्यमातून भाषा, साहित्य आणि कलेचे संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. पुरस्कारांच्या माध्यमातून देश आणि माणसे जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अकादमी करत आहे. संस्कृतीचे महत्त्व विसरण्याची वेळ आलेल्या काळात अकादमीचे कार्य अधिक मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. राजारामबापू पाटील हे सुसंस्कृत नेतृत्व होते. त्यांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी पुरस्कारांच्या माध्यमातून सुरू असलेला उपक्रम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ विचारवंत प्रा. अशोक चौसाळकर म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे मॉडेल उभे केले आणि ते प्रत्यक्षात राबविण्याचे कार्य राजारामबापूंनी केले.

माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, लोकनेता कसा असावा याचा आदर्श राजारामबापू पाटील यांनी घालून दिला. ते केवळ राजकारणी नव्हते, तर समाजहितासाठी लढणारे खरे लोकनेते होते. सत्ता माणसाला मोठे करत नाही, तर समाजासाठी केलेले कार्य व्यक्तीला मोठेपण प्राप्त करून देते, असेही त्यांनी सांगितले.

कवयित्री सिसिलिया कारव्हालो यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, ॲड. राजाभाऊ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र, गोवा आणि सीमाभागातील साहित्यप्रेमी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी केले, तर आभार प्राचार्य अनिल सावंत यांनी मानले.

बेळगाव महाराष्ट्राचेच : जयंत पाटील

बेळगावात शेकडो वर्षांपासून मराठी भाषिक वास्तव्यास आहेत. मराठी भाषेवरील प्रेमातूनच सीमाप्रश्नाचा लढा सुरू आहे. त्यामुळे बेळगाव महाराष्ट्राचेच असल्याची भावना आमच्या मनात असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. साहित्य समाजाला दिशा देण्याचे आणि परिवर्तन घडविण्याचे कार्य करत असते. जिथे मराठी भाषिक आहेत, त्या ठिकाणी साहित्यिक कार्यक्रम घेण्याच्या उद्देशाने बेळगावात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मान्यवरांचा पुरस्काराने गौरव

यावेळी प्रा. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना एक लाख रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कविता आणि ललित लेखनातील योगदानाबद्दल कवयित्री सिसिलिया कारव्हालो (वसई), दक्षिण भारतातील मराठी भाषेच्या अभ्यासपूर्ण कार्यासाठी संशोधक डॉ. विवेकानंद गोपाल (तंजावर), कथासाहित्यातील योगदानासाठी डॉ. सुरेंद्र दरेकर (अहिल्यानगर), तर समीक्षेतील कार्यासाठी प्रा. डॉ. रणधीर शिंदे (कोल्हापूर) यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात आले. मराठी भाषेच्या प्रसारासाठी कार्य करणारे अनंत कदम (होळसमुद्र, कर्नाटक) यांनाही १५ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

The post बेळगाव महाराष्ट्राच्या अस्मितेचे धगधगते हृदय appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात उद्या राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा
डॉ. सुनीलकुमार लवटे, सिसिलिया कार्व्हालो, विवेकानंद गोपाल, सुरेंद्र दरेकर, रणधीर शिंदे, अनंत कदम यांचा समावेश

बेळगाव : राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) आणि शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान २०२६’ पुरस्कार वितरण सोहळा उद्या शनिवार दि. १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांना राष्ट्रीय पातळीवरील सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.

यंदाचा ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान’ प्रसिद्ध लेखक, अनुवादक आणि मराठी-हिंदी साहित्याचे अभ्यासक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान’ पुरस्कारासाठी कवयित्री व लेखिका सिसिलिया कार्व्हालो (वसई), दक्षिण भारतातील मराठी भाषेच्या अभ्यासपूर्ण योगदानाबद्दल संशोधक डॉ. विवेकानंद गोपाल (तंजावर, तामिळनाडू), कथासाहित्यातील योगदानाबद्दल कथाकार व कादंबरीकार डॉ. सुरेंद्र दरेकर (अहिल्यानगर) आणि समकालीन मराठी समीक्षेतील योगदानाबद्दल समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे (शिवाजी विद्यापीठ) यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला विशेष सन्मान’ लेखन व मराठी भाषेच्या प्रसारासाठी अनंत कदम (होळसमुद्र, कर्नाटक) यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे.

प्रसिद्ध विचारवंत आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या निवड समितीने पुरस्कारार्थींची निवड केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील साहित्य, समीक्षा, संशोधन आणि मराठी भाषेच्या जतनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार असल्याने साहित्य क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.

राजारामबापू पाटील ललित कला अकादमीतर्फे स्व. राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर हे सन्मान प्रदान केले जात आहेत. यापूर्वी पुणे, बडोदा आणि गोवा येथे पुरस्कार वितरण सोहळे पार पडले आहेत.

The post बेळगावात उद्या राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा appeared first on News 24 Tass Marathi.

लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा १६ मे रोजी
मध्यवर्ती म. ए. समितीचे मराठी बांधवांना उपस्थितीचे आवाहन

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या आवाहनानुसार, राजारामबापू पाटील ललित कला अकादमी महाराष्ट्र राज्य आणि शब्दगंध कवी मंडळ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार वितरण समारंभ’ शनिवार, १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वा. आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम ओव्हरब्रिज खानापूर रोड ओरिएंटल हायस्कूलजवळ, श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. बेळगाव, बेळगाव तालुका आणि खानापूर तालुक्यातील मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.

या समारंभात डॉ. सुनील कुमार लवटे, सिसिलिया कारवालो, डॉ. विवेकानंद गोपाल, डॉ. सुरेंद्र दरेकर, डॉ. रणधीर शिंदे आणि अनंत कदम यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंतराव पाटील राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. अशोक चौसाळकर आणि प्रतीक पाटील उपस्थित राहणार आहेत.

The post लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा १६ मे रोजी appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी संस्कृतीने आपले सामर्थ्य ओळखावे !
डॉ. सागर देशपांडे यांचे प्रतिपादन

वा. च. मंडळाचा साहित्य पुरस्कार सोहळा

बेळगाव : मराठी ही भारतातीलच नव्हे तर जगातली एक प्रमुख भाषा आहे. आज जगात मराठी बोलणारे १५ कोटी लोक आहेत. ही संख्या जपानच्या लोकसंख्ये एवढी आहे. ज्या भाषेला ९४ बोली भाषा आहेत, ज्या भाषेत दरवर्षी २५० साहित्य संमेलने होतात, ज्या भाषेत दरवर्षी ३००० हून अधिक पुस्तके प्रकाशित होतात त्या भाषेने आणि भाषिकांनी न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन डॉ. सागर देशपांडे यानी केले. ‘कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगात मराठीचे महत्व आणि भविष्यवेध’ या विषयावर ते आपले विचार मांडत होते- वाङ्मय चर्चा मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष विजय देशपांडे, प्रमुख नीता कुलकर्णी, जगदीश कुंटे व स्वाती कुलकर्णी या होत्या.

डॉ. सागर देशपांडे पुढे म्हणाले,” नवी पिढी इंग्रजी माध्यमाकडे वळली याला आपणच जबाबदार आहोत. पण अजून वेळ गेलेली नाही. मुलांशी आपण आपल्या भाषेतून संवाद साधायला हवा. आपण आपल्या मुलांना, नातवंडाना मराठी शिकवलं पाहीजे. जमतील तेवढे व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. इंग्रजीला आमचा विरोध नाही. पण इंग्रजीतून शिक्षणाला विरोध आहे. “

कृत्रिम प्रज्ञा म्हणजे एआयच्या युगात मराठीला अधिक संधी उपलब्ध आहे. एआय मुळे माहितीचे संकलन सोपे होत आहे. कवितांचा अन्वयार्थ लावणे सुलभ होणार आहे. जे सच्चे आहे त्याला एआय जमान्यात मरण नाही, उलट त्याला जास्त मान मिळेल. आपल्या कवितांचे, लावण्यांचे, ओव्यांचे आणि म्हणीचे वैभव आपण नव्या पिढीपर्यंत सहज पोचवू शकू.

सर्व तऱ्हेच्या गाण्यांचे, साहित्याचे पॅटर्न आता एआयमुळे मिळू शकतील. आपल्या भाषेचं, आपल्या गावाचं, आपल्या संस्कृतीचं महत्व शाळा कॉलेजीसनी त्याच प्रमाणे ग्रंथालय आदि संस्थांनी जपलं पाहिजे. जिथं जिथं मराठी भाषिक लोक आहेत तिथं तिथं मराठीचे पुनरुज्जीवन होत आहे. गेल्या एकाच वर्षात अमेरिकेत ५० नवे मराठी वर्ग सुरु झाले- ज्ञान ही अमेरीकेची ताकद आहे. ही ताकद आपण जेव्हा ओळखू तो सुदिन असे ते पुढे म्हणाले.

त्यानंतर वर्ष २०२४ व २०२५ या दोन वर्षांकरीता साहित्य पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. सर्वश्री संतोष आळंजकर, अनंता सूर, विजय माळी, नवनाथ गोरे, डॉ. माधव पुराणिक आणि नंदन हेर्लेकर थाना २०२४ चे तर २०२५ साठी संगीता अरबुने, कल्लाप्पा पाटील, बाळासाहेब नागरगोजे, संजय आंग्रे, प्रा. सुहास बोबडे आणि उदय लवाटे याना पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी संगीता अरबुने यांनी वा. च. मंडळाला देणगी दिली.

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पुणे येथे नुकताच ज्यांचा सत्कार करण्यात आला त्या बेळगावच्या ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांचा वाङ्‌मय चर्चा मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.

वरेरकर नाटय संघाच्या सभागृहात रविवार दि. १० मे रोजी पार पडलेल्या या समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्रा. अनिल पाटणेकर यांनी केले. जगदीश कुंटे यानी डॉ. सागर देशपांडे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर पाटणेकर यांच्याहस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचा परिचय स्वाती कुलकर्णी आणि नीता कुलकर्णी यांनी करून दिला. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या वतीने डॉ. माधव पुराणिक यानी मनोगत व्यक्त केले. माधव कुंटे यानी सूत्रसंचालन करून आभार मानले.

The post मराठी संस्कृतीने आपले सामर्थ्य ओळखावे ! appeared first on News 24 Tass Marathi.

संवादिनी वादक पं. सुधांशु कुलकर्णीना कै. पं. आप्पासाहेब जळगांवकर पुरस्कार प्रदान
पुणे : ज्येष्ठ हार्मोनियमवादक पं. आप्पासाहेब जळगांवकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निगडी येथे संवादिनी कला मंच आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वरसामन्वय” या अनोख्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बेळगावचे प्रख्यात संवादिनी वादक डॉ. सुधांशु कुलकर्णी यांचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आणि हार्मोनियमच्या परंपरेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कै. पं. अप्पासाहेब जळगावकर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.हा पुरस्कार प्रख्यात व्हायोलिनवादक पं. अतुल कुमार उपाध्ये यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

संवादिनी कला मंचचे अध्यक्ष श्री. संतोष घंटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा कार्यक्रम रसिकांना हार्मोनियमच्या समृद्ध परंपरेचा आणि विविध वाद्यांच्या सुरेल संगमाचा आगळावेगळा अनुभव देणारा ठरला. निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात हार्मोनियमवादक डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांच्या विशेष सत्कार व पुरस्कार प्रदान समारंभाने झाली. यानंतर सुप्रसिद्ध गायिका डॉ. राधिका जोशी यांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या गायनाला हार्मोनियमवर श्री. सुरेश फडतरे तर तबल्यावर पार्थ ताराबादकर यांनी समर्थ साथसंगत दिली.

त्यानंतर डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांचे विशेष हार्मोनियम वादन रंगले. त्यांच्या वादनाला तबल्यावर श्री. विनायक गुरव यांनी प्रभावी साथ दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. राधिका जोशी, राकेश श्रीवास्तव, डॉ. अवंतिका सिन्हा, संतोष घंटे, डॉ. सुधांशु कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

‘या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली हे माझे भाग्य समजतो. मी अजूनही विद्यार्थीच आहे आणि साधक म्हणून हा प्रवास असाच पुढे होत राहील” अशा शब्दात पं. सुधांशु कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

The post संवादिनी वादक पं. सुधांशु कुलकर्णीना कै. पं. आप्पासाहेब जळगांवकर पुरस्कार प्रदान appeared first on News 24 Tass Marathi.

चिन्मयी उप्पार पर्ल ऑफ ज्ञानसागर पुरस्काराची मानकरी
सृष्टी संतोष हलकर्णी ही रायजिंग स्टार अवॉर्डची तर प्रत्यक्ष आनंद घिवारी ठरला विद्यार्थी रत्न पुरस्काराचा मानकरी

बेळगाव : ज्ञानसागर स्कुलची विद्यार्थिनी चिन्मयी केंपन्ना उप्पार ही ‘ पर्ल ऑफ ज्ञानसागर 2025-26 ‘ पुरस्काराची मानकरी ठरली. सृष्टी संतोष हलकर्णी हिने ‘ रायजिंग स्टार अवॉर्ड 2025-26 ‘ हा पुरस्कार पटकाविला तर प्रत्यक्ष आनंद घिवारी हा ‘ विद्यार्थी रत्न 2025-26 ‘ पुरस्काराचा मानकरी ठरला.

समर्थनगर प्रभागाच्या नगरसेविका नेत्रा भागवत, निवृत्त आर्मी पोलीस परशराम बेकवाडकर, सामाजिक कार्यकर्ते आणि श्री एकदंत युवक मंडळाचे पदाधिकारी संतोष कणेरी, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव, पत्रकार रवींद्र जाधव यांच्या हस्ते चिन्मयी केंपन्ना उप्पार, सृष्टी संतोष हलकर्णी आणि प्रत्यक्ष आनंद घिवारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नर्सरी विभागात 100 टक्के गुण घेऊन पहिला क्रमांक मिळविलेल्या सृष्टी हलकर्णी, शौर्य शेठ, सुकृती कंग्राळकर, सानवी उप्पार, स्वराज्य जालगार, दुसरा क्रमांक मिळविलेल्या क्रिशा बैलाप्पगोळ तसेच अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळविलेल्या श्रीसैल वस्त्रद व धृती शिगिहळ्ळी, एलकेजी विभागात पहिला क्रमांक पटकाविलेल्या प्रत्यक्ष आनंद घिवारी, दुसरा क्रमांक घेतलेल्या अरुंधती कम्मार तसेच अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविलेल्या आराध्या भातकांडे, आरोही मडीवाळ आणि अमित विटेकर यांचा तसेच युकेजी विभागात 100 टक्के गुण घेऊन पहिला क्रमांक मिळविलेल्या चिन्मयी उप्पार, 99.08 टक्के गुणासह दुसरा क्रमांक पटकाविलेल्या प्रमिता बुल्ली, तिसरा क्रमांक घेतलेल्या दिव्यांश प्रजापती तर चौथा क्रमांक मिळविलेल्या आरोही बांडगी यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पर्ल ऑफ ज्ञानसागर पुरस्काराची मानकरी चिन्मयी केंपन्ना उप्पार हिने मनोगत व्यक्त केले. नगरसेविका नेत्रा भागवत यांनी गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिक्षिका सुधा मुचंडी, स्वाती कंग्राळकर यासह पालक उपस्थित होते.

The post चिन्मयी उप्पार पर्ल ऑफ ज्ञानसागर पुरस्काराची मानकरी appeared first on News 24 Tass Marathi.

ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे : गेल्या काही वर्षांत मराठी इंडी संगीताने स्वतःची एक ठळक ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांच्या चौकटीबाहेर पडत, स्वतंत्रपणे संगीतनिर्मिती करणाऱ्या कलाकारांच्या या नव्या लाटेला ‘मिमा’सारख्या व्यासपीठामुळे योग्य ओळख आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे या सोहळ्यात अधोरेखित झाले. गायक, संगीतकार, वादक, गीतकार तसेच तांत्रिक क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान करून इंडी संगीताच्या सर्वांगीण प्रवासाचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात शास्त्रीय अजित कडकडे संगीत आणि भजनासाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गीतकार गुरु ठाकूर आणि गायिका बेला शेंडे यांना ‘मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बासरीवादनातील उत्कृष्टतेसाठी अमर ओक यांना ‘एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’, तर तांत्रिक क्षेत्रातील योगदानासाठी प्रमोद चांदोरकर यांना ‘टेक्निकल एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’ देण्यात आला. ‘सोबतीचा करार’ या कार्यक्रमाला ‘आयकॉनिक म्युझिक शो’चा मान मिळाला, तर अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या अल्बमला ‘आयकॉनिक म्युझिक अल्बम’ म्हणून गौरविण्यात आले. विशेष कामगिरीची दखल घेत आकाश देशमुख (टेंभुर्णी) यांना ‘विशेष दिव्यांग कलाकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर परदेशात मराठी संस्कृतीचा ठसा उमटवणाऱ्या व्ही. रमेश (सौदी अरब) यांना ‘प्रवासी मराठी कलाकार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

The post ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान appeared first on News 24 Tass Marathi.

नेताजी हायस्कूल सुळगे (ये.) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात
मान्यवरांचे मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

सुळगे (ये.) : येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये.) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सदिच्छा समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आर. एस. नंद्याळकर होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते पी. जी. पाटील, शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष बी. बी. पाटील, उपाध्यक्ष भाऊराव होनगेकर, एन. आर. पाटील, पांडुरंग कोळशेकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील आणि प्रभाकर नावगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटोपूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. हायस्कूलचे मुख्याध्यापक टी. वाय. भोगण यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत करून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी विद्यार्थिनी प्रिया श्रीकांत पाटील, करुणा रमेश गडकरी आणि सेजल मधुकर थोरवत यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांच्या वतीने आर. एस. कंग्राळकर यांनी मार्गदर्शन केले, तर सहशिक्षक एम. पी. कंग्राळकर यांनी स्वलिखित कविता सादर केल्या. यानंतर ए. बी. पाटील यांनी पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रमुख वक्ते पी. जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवून आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात बी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे आणि ताणतणाव न घेता धैर्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. वाय. व्हंडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जे. जे. पाटील यांनी मानले.

The post नेताजी हायस्कूल सुळगे (ये.) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

प्रशांत खन्नूकर ‘गोरल क्लासिक येळ्ळूर’ किताबाचा मानकरी
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आयोजित गोरल क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत नेक्स्ट लेव्हल जीमच्या प्रशांत खन्नूकर याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर गोरल क्लासिक मानाचा किताब पटकाविला.तर मंथन जीमच्या किशोर पुजारीने उत्कृष्ट पोझर हा बहुमान मिळविला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे 125 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

गोरल क्लासिक किताबासाठी केतन भातकांडे, संजय बस्तवाडकर, अवनिश पुजारी, सुनील भातकांडे, प्रताप कालकुंद्रीकर, प्रशांत खन्नूकर, विशाल चव्हाण यांच्यात लढत झाली. त्यानंतर प्रताप कालकुंद्रीकर, प्रशांत खन्नूकर व विशाल चव्हाण यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये प्रशांत खन्नूकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर गोरल क्लासिक येळ्ळूर हा मानाचा किताब पटकावला. तर उत्कृष्ट पोझर स्पर्धेत मंथन जीमच्या किशोर पुजारी याने आपल्या उत्कृष्ट पोझिंगद्वारे उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला.

पुरस्कर्ते रमेश गोरल, अजित सिद्दण्णवर व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या प्रशांत खन्नूकरला मानाचा किताब, चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू तर किशोर पुजारीला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. एम. गंगाधर, हेमंत हावळ, प्रकाश पुजारी, राजाराम मजुकर, सुनील पवार, आनंद लंगरकांडे, राजशेखर चव्हाण, आकाश हुलीयार, नूरमुल्ला, सुनील अष्टेकर, गजानन हंगिरगेकर, सुनील राऊत यांनी काम पाहिले.

The post प्रशांत खन्नूकर ‘गोरल क्लासिक येळ्ळूर’ किताबाचा मानकरी appeared first on News 24 Tass Marathi.

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू”
हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

​बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण, ज्ञानज्योती पुरस्कार वितरण, ज्ञानशिखर सन्मान पुरस्कार वितरण आणि मागील शैक्षणिक वर्षात अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम मराठा मंदिर येथे संपन्न झाला.

​त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार श्री. हेमंत ढोमे उपस्थित होते. त्यांनी ‘अस्तित्व मराठी शाळेचे, संवर्धन मराठी भाषेचे’ या विषयावर आपले विचार मांडले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “मातृभाषेतून शिकले तर प्रगतीचे घोडे कुठेच अडत नाही. मराठी माध्यमातून शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या पदांपर्यंत मजल मारली आहे आणि ते इंग्रजी भाषाही चांगल्या पद्धतीने बोलू शकतात. सध्या महाराष्ट्रात मराठी शाळांना वाईट दिवस आले असून पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे आहे ; हीच परिस्थिती सीमाभागातही दिसत आहे. देशातील तुळू भाषा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भाषा टिकली नाही तर संस्कृती टिकणार नाही , त्यामुळे मराठी संपू नये ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यामध्ये मराठी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. माझ्याकडून मराठी भाषेसाठी आणि शाळांसाठी जे काही करता येईल, त्यासाठी मी सदैव तयार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रदीर्घ काळापासून चाललेला सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू आणि आम्ही सीमाभागातील मराठी भाषिकांच्या सोबत आहोत , अशी ग्वाही त्यांनी दिली.

​बेळगावातील युवा कलाकार शिवराज चव्हाण यांनी परिसंवादात हेमंत ढोमे यांची मुलाखत घेतली. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, प्रकाश मरगाळे, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, म. ए. समिती महिला आघाडीच्या रेणू किल्लेकर आणि युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. हेमंत ढोमे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

​बेळगाव शहर, ग्रामीण व खानापूर तालुक्यातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक, स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन गौरविण्यात आले. सामान्यज्ञान परीक्षेत यश मिळवलेल्या लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बेळगावसह खानापूर तालुक्यातील एकूण पाच शाळांना ‘श्रीनिवास केशवराव म्हणपसेकर’ यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

​यावर्षी प्रथमच, प्रतिकूल परिस्थितीत मराठी शाळा टिकवणाऱ्या शाळांसाठी ‘ज्ञानज्योती पुरस्काराची’ घोषणा करण्यात आली होती; हा पुरस्कार सरकारी मराठी शाळा, जामगाव (ता. खानापूर) या शाळेला देण्यात आला. तर मागील काही वर्षांपासून शैक्षणिक उपक्रमात सातत्य आणि परिपूर्णतेसाठी धडपडणाऱ्या शाळांसाठी ‘ज्ञानशिखर सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता. त्यान्वये मॉडेल प्राथमिक शाळा, येळ्ळूर आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

​या कार्यक्रमाला म. ए. समितीचे व युवा समितीचे पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गोरल हिने केले. स्वागत सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी, तर प्रास्ताविक चिटणीस प्रतीक पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले यांनी मानले.

The post “सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” appeared first on News 24 Tass Marathi.