annual gathering Archives | News 24 Tass Marathi

गुरु – शिष्य नात्याचा भावस्पर्शी सोहळा
शाळा नं. १९ च्या १९९३ बॅचचा गुरुवंदना व स्नेहमेळावा उत्साहात

बेळगाव : अळवण गल्ली शहापूर येथील सरकारी मराठी मुला- मुलांची शाळा नंबर १९ च्या १९८७ ते १९९३ बॅचवतीने आयोजित माजी विद्यार्थ्यांचा गुरुवंदना व स्नेहमेळावा कार्यक्रम नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल ३३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जुन्या आठवणी, मित्रांची साथ आणि शिक्षकांचे प्रेम यामुळे संपूर्ण परिसर भावनांनी भारावून गेला होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थिनींनी गुरुजनांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शाळेतील दिवंगत माजी विद्यार्थी आणि गुरुजनांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुजनांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व गुरुजनांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अनेक वर्षांनंतर आपल्या विद्यार्थ्यांकडून मिळालेला हा सन्मान स्वीकारताना अनेक गुरुजन भावूक झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सौ. ज्योती जिवण्णावर टीचर यांनी आपल्या मनोगतात मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “मातृभाषेतून शिक्षण घेतलेली मुले जीवनात अधिक सक्षम आणि यशस्वी होतात. मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपल्या संस्कृतीशी आणि भाषेशी नाते अधिक घट्ट असते. मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचे मोठे कार्य मराठी माध्यमातील विद्यार्थीच करू शकतात,” असे त्या म्हणाल्या. सध्या पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढता कल पाहता मराठी शाळांची पटसंख्या कमी होत असून मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांशी एक वेगळे भावनिक नाते तयार होते. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेले विद्यार्थी आजही आपल्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी एकत्र येतात, हीच खरी शिक्षणाची ताकद आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी श्रीमती मंदाकिनी एम. सुभेदार, श्रीमती सुरेखाताई सदाशिवराव कुलकर्णी, सौ. सुनीता जिनाप्पा पाटील (कडोलकर), सौ. मंदाकिनी मनोहर देसाई, श्रीमती कुसुम के. राणे, सौ. सविता चंद्रकांत चंदगडकर (निकम), श्रीमती मनीषा महादेव खन्नूकर (पवार) आदी गुरुजनांनीही आपल्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यंदाच्या एसएसएलसी परीक्षेत यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वेदांत विजय शिखरे, अमीर इमरान पठाण, प्रीती कृष्णा शेलार, स्वयम राजेश दिवाकर, पुनम मनोहर पाटुकले या पाल्यांचा व गुरुजनांच्या आर्या नरसिंह जिवण्णावर, वेदांत विवेक पाटील, श्रेयस विकास देसाई या नातवंडांचा विशेष गौरव करण्यात आला.

माजी विद्यार्थी विनायक गावडे, वृंदा वेसणे, चंद्रशेखर चव्हाण आणि सुहास हुद्दार यांनी आपल्या भावना व्यक्त करत गुरुजनांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय शिक्षकांना करून देत जुन्या आठवणींना पुन्हा एकदा जिवंत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक गावडे यांनी तर आभार प्रदर्शन अर्चना किल्लेदार यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थ्यांसह अळवण गल्ली परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

The post गुरु – शिष्य नात्याचा भावस्पर्शी सोहळा appeared first on News 24 Tass Marathi.

सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलाविष्काराने रंगत ; गुणवंतांचा गौरव

येळ्ळूर : सरकारी मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात शैक्षणिक गुणवंतांचा सत्कार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा सौ. दिव्या संदीप कुंडेकर होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थीनी तथा कौशल्य अभिवृद्धी केंद्राच्या निर्देशक आणि व्हीटीयू महिला घटक अध्यक्षा डॉ. संध्या राजन अणवेकर उपस्थित होत्या. बेळगाव ग्रामीणचे क्षेत्र शिक्षणाधिकारी श्री. अंजनेय आर. के., सीआरपी येळ्ळूर केंद्रप्रमुख श्री. महेश जळगेकर, येळ्ळूर वाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. पाटील यांच्यासह एसडीएमसी उपाध्यक्ष, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने भगवा फेटा, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती देवी, राजमाता जिजाऊ, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन एसडीएमसी सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर वरिष्ठ मुख्याध्यापक श्री राजेंद्र चलवादी यांनी प्रास्ताविक केले.

क्षेत्र शिक्षणाधिकारी श्री. अंजनेय आर. के. यांनी शाळेला मिळालेल्या कर्नाटका पब्लिक स्कूल दर्जाबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना मोबाईल व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे मार्गदर्शन केले. सीआरपी श्री महेश जळगेकर यांनी स्वरचित कविता सादर केली. डॉ. संध्या अणवेकर यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत शाळेने दिलेल्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षातील दहावी परीक्षेत येळ्ळूर केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही बक्षिसे प्रदान करण्यात आली. ‘भाग्यवान पालक’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुमारे २८ विविध विषयांवर आधारित नृत्य व नाट्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत व आभार प्रदर्शन शिक्षकवृंदांनी केले. शेवटी लॉटरी पद्धतीने भाग्यवान पालक म्हणून श्री. उमेश पाटील यांची निवड झाली. या सोहळ्यास शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘समन्वय’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अविट मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध

बेळगाव : द. म. शि. मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन ‘समन्वय’ मराठा मंदिर (खानापूर रोड) येथे उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमांची अविट मेजवानी अनुभवत उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

प्रार्थनागीत, देशगीते, लोकगीते, भावगीते व भक्तिगीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘शेतकऱ्याचा आसूड’ आणि ‘वुमन क्रिकेट’ ही नाटके विशेष आकर्षण ठरली. सामाजिक संदेश आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगती प्रभावीपणे मांडण्यात आली.

पहिल्या दिवशी डॉ. मिलिंद हलगेकर तर दुसऱ्या दिवशी डॉ. शैलेश पाटील प्रमुख अतिथी होते. व्यासपीठावर द. म. शि. मंडळाचे पदाधिकारी, शाळेचे संस्थापक, व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्या सोनाली कंग्राळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नॅशनल लेव्हल स्विमिंग चॅम्पियन वेदांत मिसाळे आणि क्रिकेटपटू सिद्धार्थ अधिकारी यांचा पालकांसह गौरव करण्यात आला. तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

अतिथींनी पालकांना मार्गदर्शन करताना मुलांसाठी वेळ, संवाद, प्रेम व शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. चेअरमन आर. के. पाटील यांनी मुलांची स्वप्ने ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. ॲडव्हायझरी डायरेक्टर मायादेवी अगसगेकर यांनी शाळेच्या भावी योजनांची माहिती दिली, तर प्राचार्या सोनाली कंग्राळकर यांनी वार्षिक प्रगती अहवाल सादर केला.

यशस्वी आयोजन व विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले असून, या स्नेहसंमेलनाने ज्योती सेंट्रल स्कूलच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीत मानाचा तुरा रोवला आहे.

The post ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘समन्वय’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.