airport Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव – मुंबई दरम्यान २९ मार्चपासून दोन विमानफेऱ्या सुरू
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधून मुंबई शहराला रविवार, दि. २९ मार्चपासून दोन विमानफेऱ्या सुरू होत आहेत. मुंबई व नवी मुंबई या दोन्ही विमानतळांसाठी सेवा उपलब्ध झाल्यामुळे बेळगावमधील व्यापारी-उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यामुळे प्रवाशांना सकाळी मुंबईत पोहोचून रात्री परत येण्याची सुविधा मिळणार आहे. या मार्गावर विमानसेवा डिसेंबर २०२५ पासून स्टार एअरने थांबविली होती, ज्यामुळे व्यापारी व उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स आणि बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशनने विमानतळ प्राधिकरणाकडे मागणी केली होती, तर खासदार जगदीश शेट्टर यांनी इंडिगो एअरलाईन्ससोबत चर्चा करून सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

याअनुषंगाने इंडिगो एअरलाईन्सने बेळगाव–नवी मुंबई मार्गावर सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, तर स्टार एअरने बेळगाव–मुंबई मार्गावर आपली सेवा पुन्हा सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई ते मुंबईदरम्यान प्रवाशांसाठी सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.

विमानसेवा वेळापत्रक:

इंडिगो एअर : सकाळी १०:२० वाजता नवी मुंबईतून निघणार, सकाळी ११:४५ वाजता बेळगावात पोहोचणार. परतीची वेळ – सायंकाळी ५:३५ वाजता बेळगावहून निघून ६:५० वाजता नवी मुंबई पोहोचणार.

स्टार एअर : सकाळी ७:२० वाजता बेळगावहून निघणार, ८:२५ वाजता मुंबईत पोहोचणार. परतीची वेळ – सायंकाळी ७:४५ वाजता मुंबईहून निघून रात्री ८:५० वाजता बेळगाव पोहोचणार. बेळगावहून मुंबईला फक्त १ तास १५ मिनिटांत पोहोचता येणार आहे, जे व्यवसायी व प्रवाशांसाठी मोठी सोय ठरणार आहे.

The post बेळगाव – मुंबई दरम्यान २९ मार्चपासून दोन विमानफेऱ्या सुरू appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव – नवी मुंबई थेट विमानसेवा २९ मार्च पासून
इंडिगोची घोषणा ; सहा शहरांसाठी एटीआर उड्डाणे

मुंबई : इंडिगो कंपनीने आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सहा देशांतर्गत शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. २९ मार्च २०२६ पासून अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूर या शहरांना सेवा उपलब्ध होणार असल्याचे वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे.

कंपनीच्या अधिकृत निवेदनानुसार, या मार्गांवर एटीआर विमानांचा वापर करण्यात येणार आहे. प्रादेशिक संपर्क वाढवणे आणि नवी मुंबईतील उपस्थिती मजबूत करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. या नव्या उड्डाणांमुळे महानगरांमधून टियर-२ आणि टियर-३ शहरांकडे प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

या सेवांसाठी तिकिट बुकिंग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत असून, इंडिगोची अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप तसेच अधिकृत ट्रॅव्हल एजंट्समार्फत तिकिटे उपलब्ध असतील. एटीआर नेटवर्कचा विस्तार करून पर्यटनाला चालना देणे, प्रादेशिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि लहान शहरांना मोठ्या महानगरांशी जोडणे हे कंपनीच्या व्यापक धोरणाचा भाग असल्याचे इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

The post बेळगाव – नवी मुंबई थेट विमानसेवा २९ मार्च पासून appeared first on News 24 Tass Marathi.

विमानतळ भूसंपादन प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांना न्यायालयाचा दणका
मोबदला न दिल्याने सरकारी गाडी जप्त

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील सांबरा येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून मोबदला न दिल्याने प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी बेळगाव उपविभागीय अधिकाऱ्यांची सरकारी गाडी तसेच कार्यालयातील संगणक जप्त करण्यात आले.

सन २०१० मध्ये विमानतळाच्या विकासासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, १६ वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना कोणताही मोबदला देण्यात आलेला नव्हता. यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत बेळगाव तिसरे दिवाणी न्यायालय यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले. यानुसार ही कारवाई करण्यात आली.

याबाबत माहिती देताना वकील एस. एस. शेट्टर यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वीच न्यायालयाने सहा शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, प्रशासनाने त्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर जप्तीची कारवाई करावी लागली. या घटनेमुळे भूसंपादन प्रकरणातील प्रशासनाच्या दिरंगाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

The post विमानतळ भूसंपादन प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांना न्यायालयाचा दणका appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावला डावलून बेंगळूरला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ
उत्तर कर्नाटकावर अन्यायाचा आरोप

गोवा – महाराष्ट्राला जोडणाऱ्या प्रवेशद्वाराकडे सरकारचे दुर्लक्ष

बेळगाव / प्रतिनिधी

दक्षिण भारतासह गोवा आणि महाराष्ट्राला जोडणारे महत्त्वाचे केंद्र असलेल्या बेळगावला अद्याप आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे, आधीच देवनहल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या बेंगळूरमध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उत्तर कर्नाटकावर पुन्हा एकदा अन्याय झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

बेंगळूरनंतर कर्नाटकाची दुसरी राजधानी असलेल्या बेळगावकडे सरकारचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आधीच कार्यरत असलेल्या देवनहल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळानंतरही बंगळुरूला दुसऱ्या विमानतळाची गरज आहे का, असा थेट सवाल नागरिकांनी केला आहे.

कर्नाटकचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेला बेळगाव जिल्हा गोवा व महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारताला जोडणारा दुवा आहे. सुवर्ण विधानसौध, अद्ययावत विमानतळ, विद्यापीठे, पर्यटनस्थळे, केएलईसारख्या आंतरराष्ट्रीय करार असलेल्या शैक्षणिक संस्था, रेल्वे स्थानक यांसह आवश्यक सर्व पायाभूत सुविधा येथे उपलब्ध असल्याचेही निदर्शनास आणले जात आहे.

या भागातील मोठ्या संख्येने नागरिक परदेशात प्रवास करतात. मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी त्यांना सुमारे ५०० किलोमीटर दूर असलेल्या बेंगळूरला किंवा २५० ते ३०० किलोमीटर अंतरावरील गोव्याला जावे लागते. सध्या बेळगावहून बंगळुरू, दिल्ली, गोवा, तामिळनाडू यांसारख्या ठिकाणी विमानसेवा सुरू असून, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

तरीही उत्तर कर्नाटकाला आंतरराष्ट्रीय विमानतळापासून वंचित ठेवून सरकार सावत्रपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे बेंगळूरमध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्याचा निर्णय घेतला जात असताना बेळगावकडे दुर्लक्ष होणे अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नांमुळे बेळगाव रेल्वे स्थानकाचे पुनरुज्जीवन आणि अद्ययावतीकरण झाले असून, शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगावला आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्याची मागणी अधिक तीव्र होत असून, सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

The post बेळगावला डावलून बेंगळूरला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ appeared first on News 24 Tass Marathi.

दिल्ली – बेळगाव विमान चार तास विलंबाने
धुक्यामुळे अडचण, मंत्री व आमदार अडकले ; ‘इंडिगो’ कडून गैरसोय

बेंगळूर : नवी दिल्लीहून बेळगावला येणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला सुमारे चार तासांचा मोठा विलंब झाल्याने २१ मंत्री आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. दिल्लीहून जाणारे विमान मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता बेळगावच्या सांबरा विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, हे विमान तब्बल चार तास उशिरा दुपारी १२.१५ दाखल झाले. या विलंबामुळे विमानातील प्रवासी विशेषतः मंत्री व आमदार हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीतील ताट धूर व धुक्यामुळे ही स्थिती निर्माण झाली.

शहरात आयोजित ‘मत चोरी’ विषयावरील परिषदेसाठी मंत्री व काँग्रेस आमदार दिल्लीला आले होते. त्यानंतर दावणगिरी येथे होणाऱ्या ज्येष्ठ काँग्रेस नेते शमनूर शिवशंकरप्पा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीहून बेळगावला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने ते प्रवास करणार होते. मात्र, आमदार पहाटे सुमारे चार वाजल्यापासून विमानात बसूनही दाट दुर आणि धुक्यामुळे विमानाने उड्डाण घेतले नाही. दिल्लीतील प्रतिकूल हवामानामुळे टेक – ऑफ आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते.

या विमानातून कर्नाटक सरकारमधील वरिष्ठ मंत्री एच. के. पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर, सतीश जारकीहोळी, जे. जे. जॉर्ज, आनंद गड्डेवरमठ, तसवीर सायर, जी.एस. पाटील, मलिकय्या गुत्तेदार, ईश्वर खांड्रे, जे. टी. पाटील, तिपण्णा कमकनूर, बी. नागेंद्र, एम. बी. पाटील, अल्लमप्रभू आणि रेहमान खान यांच्यासह अनेक मंत्री व आमदार प्रवास करत होते. याशिवाय मंत्री शरणप्रकाश पाटील, आमदार राघवेंद्र इटनाळ, एन. एच. कोनरेड्डी, सलीम अहमद यांच्यासह सुमारे २१ हून अधिक लोकप्रतिनिधी या विमानात होते. सर्वजण दिल्लीतील विविध कार्यक्रम व बैठका आटोपून बेळगावकडे येत होते.

धुक्यामुळे ‘टेक – ऑफ’ ला उशीर झाला त्यामुळे विमान निश्चित वेळेत उड्डाण करू शकले नाही. परिणामी, प्रवाशांना विमानातच दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. दिल्लीतून सकाळी १० वाजता विमानाने उड्डाण घेतले. दुपारी १२.१५ वाजता बेळगावला पोहोचले.

बेळगाव सारख्या महत्त्वाच्या शहरासाठी विमान सेवा नियमित व वेळेत असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. दरम्यान, विविध कारणांमुळे बेळगावच्या विमानसेवांमध्ये सातत्याने अडथळे येत असल्याचे चित्र आहे. कधी हवामान, तर कधी तांत्रिक कारणे पुढे केली जात आहेत.

The post दिल्ली – बेळगाव विमान चार तास विलंबाने appeared first on News 24 Tass Marathi.

विमानतळ सल्लागार समिती बैठकीत विकास कामांचा आढावा
बेळगाव / प्रतिनिधी

खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव विमानतळ सल्लागार समितीची बैठक झाली. ज्यामध्ये बेळगाव विमानतळावर सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान, खासदार शेट्टर यांनी विमानतळ अधिकाऱ्यांकडून शक्यता तपासण्याचे आवाहन इंडिगो आणि स्टार एअरलाइन्स त्यांनी अधिकाऱ्यांना केले. सेवांद्वारे सध्या जोडलेल्या विमानतळाकडे जाणाऱ्या शहरांबद्दल माहिती घेतली. या रस्त्यावरील सततच्या वाहतूक ठिकाणांना जोडण्यासाठी जनतेची कोंडीवर प्रकाश टाकताना, मागणी लक्षात घेऊन, पुणे, शेट्टर यांनी नमूद केले की, राज्य चेन्नई, जोधपूर आणि तिरुपती सरकारने विद्यमान मार्गाचे चौपदरी येथे उड्डाणे सुरू करण्याची रस्त्यात रुंदीकरण करण्यासाठी ५० कोटी मंजूर केले आहेत, प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला.

अधिकाऱ्यांनी खासदारांना नवीन टर्मिनल इमारतीच्या प्रगतीची माहिती दिली, बांधकाम नियोजनानुसार पुढे जात असल्याचे आश्वासन दिले. प्रवासी सुविधा आणि विमानतळ क्षमता वाढविण्यासाठी काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश खा. शेट्टर यांनी दिले. समितीने बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या प्रस्तावावरही चर्चा केली आणि शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना या संक्रमणासाठी आवश्यक असलेले अभ्यास आणि अहवाल जलदगतीने देण्याची विनंती केली. या बैठकीला विमानतळ संचालक त्यागराजन समिती सदस्य राहुल मुचंडी, हनुमंत कागलकर, श्रीमती स्नेहला कोलकार, विजय भद्रा, राजू देसाई, जयसिंग राजपूत आणि भरत देशपांडे उपस्थित होते.

The post विमानतळ सल्लागार समिती बैठकीत विकास कामांचा आढावा appeared first on News 24 Tass Marathi.

तांत्रिक बिघाडामुळे बेळगाव – मुंबई विमान रोखले
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावहून मुंबईला जाणारे स्टार एअरचे सकाळचे विमान काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रोखण्यात आले. मात्र हे इमर्जन्सी लँडिंग नसल्याचे स्पष्टीकरण विमानतळ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. या विमानात एकूण ४८ प्रवासी बेळगाव ते मुंबई प्रवास करणार होते. मात्र विमान काही कारणामुळे स्थगित करण्यात आले. या विमान प्रवाशांसाठी स्टार एअर कंपनीने दुपारी दुसऱ्या विमानाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र प्रवाशांना काही काळासाठी प्रतीक्षा करावी लागली. यामध्ये कोणताही धास्तीचा प्रकार नव्हता. केवळ तांत्रिक बिघाड होता अशी माहिती देण्यात आली.

The post तांत्रिक बिघाडामुळे बेळगाव – मुंबई विमान रोखले appeared first on News 24 Tass Marathi.