- शिवभक्तांना दिला दिलासा
बेळगाव / प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे युवा सेना बेळगावतर्फे यंदा देखील श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणुकीप्रसंगी रसना सरबत स्वरूपात शीतपेय वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवून शिवभक्तांना दिलासा देण्यात आला.
बेळगावची श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक सलग अनेक तास चालते. त्यामुळे या कालावधीत मिरवणूक पाहण्यास गर्दी करणाऱ्या शिवभक्तांसह शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना शीतपेयाचे वाटप करून दिलासा देण्याद्वारे त्यांना तरतरीत ठेवण्याचे स्तुत्य कार्य युवासेना बेळगाव गेल्या कांही वर्षापासून सातत्याने करत आहे. त्यानुसार यंदाही मिरवणुकीचे देखावे आणि विविध मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केल्या जाणाऱ्या, विशेष गर्दी होणाऱ्या शहरातील हुतात्मा चौक येथे शीतपेय वाटपाचा हा उपक्रम राबविण्यात आला. हुतात्मा चौक येथे काउंटर स्थापन करून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शीतपेयाच्या स्वरूपात रसनाचे वाटप केले. या उपक्रमाचा सुमारे ३००० शिवभक्तांनी लाभ घेतला.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवा सेना बेळगावचे विनायक हुलजी, सोमनाथ सावंत, वैभव कामत, मल्हारी पावशे, नील तवनशेट्टी, मयांक पावशे, विद्येश बडसकर, अद्वैत चव्हाण -पाटील, ओंकार बैलूरकर, आदित्य गावडे, जय शेरेकर, विजय मोहिते, सुरज तेली, उमेश पाटील, आशुतोष जाधव, साई एन. आदींनी विशेष परिश्रम घेतले.