• चिकोडी तालुक्यातील घटना

चिकोडी / वार्ताहर

नियंत्रण सुटलेल्या एका पिकअप वाहनाची धडक बसल्याने एक महिला गंभीर जखमी झाली असून हा थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातील उमरानी गावात मुधोळ-निपाणी राज्य महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली. सरिता मारुती मगदूम (रा. उमरानी) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

अपघातानंतर तातडीने त्यांना चिकोडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, याच रस्त्यावरून जात असलेल्या इतर दोन महिला थोडक्यात बचावल्या. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, ज्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. याप्रकरणी चिकोडी वाहतूक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.