चिकोडी / वार्ताहर

कडाक्याच्या उन्हाळा तसेच तीव्र पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या सीमाभागाला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले आहे. नजीकच्या महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हे तसेच चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांची पाणी पातळी ४ फुटांपर्यंत वाढली आहे.

उन्हाळ्यात आटलेल्या कृष्णा आणि उपनद्या प्रवाहित झाल्या आहेत. संततधार पावसामुळे कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्यांची पाणीपातळी चार फुटांनी वाढली आहे. सखल भागात पाणी साचून तलावसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील नदीकाठच्या गावे आणि शहरांमधील नागरिक तसेच पशु – पक्षी पाणी टंचाईला तोंड देत होते. परंतु गेल्या दोन दिवसांत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.