- पावसाला प्रारंभ झाल्याने उपक्रमाला चालना
- यंदाच्या पावसाळ्यात हिरवळ वाढणार
बेळगाव / प्रतिनिधी
वनखात्यातर्फे वृक्ष संवर्धनासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षी लाखो रोपांची लागवड केली जाणार आहे. शहरातील विविध भागात ही लागवड होणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हिरवळ वाढणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात वनखात्यामार्फत सरकारी कार्यालये, शाळा, दवाखाना, खुल्या जागा, रस्त्याच्या दुतर्फा, आणि इतर ठिकाणी रोप लागवड केली जाते. पावसाला प्रारंभ झाल्याने रोप लागवडीला चालना देण्यात आली आहे. वनखात्याच्या नर्सरी मधील रोपवाटिका मध्ये रोप तयार करण्यात आली होती. ती रोपे आता विविध ठिकाणी लावली जात आहेत. विशेषतः फळा-फुलाची रोप लागवड केली जाणार आहे.