विजयपूर / दिपक शिंत्रे

विवाहाच्या वरातीत नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना विजयपूरमध्ये घडली आहे. नातेवाईकाच्या लग्नात नाचत असताना तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना विजयपूर शहरातील चप्परबंद कॉलनीत घडली असून, मोहम्मद पैगंबर गंगनहळ्ळी (वय 28) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून मोहम्मद अ‍ॅल्युमिनियमच्या खिडक्या आणि दरवाज्यांचे बसविण्याचे काम करत होता. ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे. गोलगुम्मट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.