• अगसगे क्रॉस येथील घटना

बेळगाव / प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकी दरम्यान वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने घडलेल्या अपघातात डॉल्बी साऊंड सिस्टम घेऊन जाणारे वाहन पलटी झाले. अगसगे क्रॉस जवळ आज सोमवारी ही घटना घडली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ट्रॅक्टरच्या सहाय्याने सदर डॉल्बी साऊंड सिस्टीम बेळगाव शहरात होणाऱ्या शोभा यात्रेत सहभागी होण्यासाठी नेण्यात येत होती. त्यावेळी हा अपघात झाला. तथापि अगसगे क्रॉसवर उंचपुऱ्या साऊंड सिस्टीममुळे चालकाचा अंदाज चुकून वळणावर संपूर्ण सिस्टीम पलटी होऊन रस्त्याशेजारी कोसळली. या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.