• सहकार्यदर्शी पदी सचिन बोंबले यांची निवड

विजयपूर / दिपक शिंत्रे
भारतीय रियल इस्टेट डेव्हलपर संघांचा महासंघ (वक्कूट)च्या जिल्हाध्यक्ष पदी शरद रुडगी तर सहकार्यदर्शी पदी सचिन बोंबले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महावीर पारेख यांच्या अध्यक्षतेखाली संघाचा कार्यालयात आयोजित सर्वसाधारण सभेत, उपाध्यक्षपदी वाहिद मनियार, कार्यदर्शीपदी विनय रुणवाल, यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी अनुपम रुणवाल, राजेंद्र रुणवाल, टपाल इंजिनिअर, अनिल आवळे, इरफान पठाण व इतर उपस्थित होते.