• जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांचा इशारा

बेळगाव / प्रातिनिधी

सोशल मीडियावर धार्मिक किंवा भाषिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट,मेसेजेस किंवा टिप्पणी केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता संबंधित व्यक्तीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा. प्रत्येकाने विचारपूर्वक आणि समजुतदारपणाने सोशल मीडियावर मजकूर शेअर करावा. समाजात शांतता ऐक्य आणि सुव्यवस्था राखणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.कोणत्याही धर्म,जाती किंवा भाषे विषयी आक्षेपार्ह,द्वेषयुक्त किंवा चिथावणीखोर पोस्ट टाकल्यास किंवा फॉरवर्ड केल्यास त्या विरोधात तातडीने कठोर कारवाई केली जाईल असेही जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.