बेळगाव / प्रतिनिधी

दुरुस्तीच्या कामानिमित्त उद्या गुरुवार दि. २९ ११० के. व्ही. उचगाव उपकेंद्राद्वारे होणाऱ्या भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत वीजपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे, असे हेस्कॉमच्या ग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे. बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, येळेबैल, राकसकोप, कुद्रेमानी, कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक वसाहत यासह उचगाव, मण्णूर, बेकिनकेरे, सुळगा, तुरमुरी, कोनेवाडी, बाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, अंगडी कॉलेज, गणेशपूर, महालक्ष्मीनगर, आर्मी कॉलनी, केएचबी ले आउट यासह या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पंपसेट परिसरातील वीजपुरवठा खंडित होणार आहे.