- विजयपूर तालुक्याच्या कुमटगी गावातील घटना
विजयपूर / दिपक शिंत्रे
तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना विजयपूर तालुक्यातील कुमटगी गावात घडली आहे. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने सहा तरुण कुमटगी तलावात पोहायला गेले होते. त्यापैकी दोन तरुण पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडले आहेत. कैफ जमादार (वय १९) व सोहेल हत्तारकीहाळ (वय २५) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

तर या घटनेत चार तरुण सुखरूप बचावले आहेत. मृत्यू झालेल्या दोघांपैकी एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर रुग्णालयात उपचार सुरू असताना दुसऱ्याची प्राणज्योत मालवली. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे.