• मिलिटरी महादेव मंदिर समोरील रेल्वे रुळावर अपघात
  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
  • हुबळी विभागाच्या तत्परतेमुळे वाहतुक सुरळीत

बेळगाव / प्रतिनिधी

जिंदालहून मिरजकडे जाणाऱ्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. बेळगाव मिलिटरी महादेव मंदिराजवळ मंगळवारी सकाळी ही घटना घडली.
बेळगाव रेल्वे स्थानकावर ट्रॅक बदलताना जिंदाल ते मिरज लोहखनिज घेऊन जाणारी रेल्वे रुळावरून घसरली.

जिंदाल कारखान्यात लोहखनिज घेऊन मिरजकडे जाणारी एक मालगाडी बेळगाव शहराच्या बाहेरील भागात रुळावरून घसरली. यामुळे काही काळ या मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. दरम्यान रेल्वेच्या हुबळी विभागाने घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेत,रुळावरून घसरलेले दोन्ही डबे मार्गावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. त्यामुळे बेळगाव मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.