बागलकोट / दिपक शिंत्रे
दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीनजण ठार झाले आहेत. हुनगुंद तालुक्यातील अमिनगडजवळ आज शुक्रवार दि. १६ मे रोजी सकाळी अमिनगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. यामध्ये संदीश वीरश अंगडी (वय १८) आणि गंगम्मा वीरश अंगडी (वय ५०) यांचा घटनस्थळीच मृत्यू झाला होता. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या वीरश अंगडी (वय ५४) यांचा बागलकोट शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातात वीरश अंगडी यांचा आणखी एक मुलगा सतीश (वय २८) हा सुदैवाने बचावला आहे.
या घटनेत दुसऱ्या कारचा चालकही जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमधील सर्वजण बदामी तालुक्यातील नेलुगी गावचे रहिवासी आहेत. या घटनेची नोंद अमिनगड पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरु आहे.