बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात नवे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी १० कोटी ४४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. बेळगाव शहराला आणखीन एक अग्निशमन केंद्र मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. बेळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि व्याप्ती पाहता शहरात आणखीन एक
अग्निशमन ठाण्याची गरज भासू लागली आहे. शहर आणि तालुक्यात आगीच्या घटनांमध्ये मागील काही वर्षात वाढ झाली आहे.आगीच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे, अग्निशमन जवानांना अवघड ठरलेले आहे.त्यामुळे नुकसानीचा आकडाही वाढू लागला आहे.
बेळगाव शहरात दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. तालुक्यातील बहुतेक गावे ही शहरानजीक आहेत. पण या सर्वांना मिळून केवळ एकच अग्निशमन ठाणे आहे. त्याच ठिकाणी अग्निशमन जिल्हा अधिकाऱ्यांचेही कार्यालय आहे. तरीही शहरातील आगीच्या घटना पाहता आणखीन एका ठाण्याची गरज भासू लागली आहे.