निपाणी / प्रतिनिधी

तवंदी घाटात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रवाशांनी ओव्हरब्रीजखाली आसरा घेतला. रविवारी तवंदी घाटात ढगफुटी सदृश पाऊस पडला. ढगांच्या गडगडासह झालेल्या जोरदार पावसामुळे लोक घाबरले होते. यावेळी कडक उन्हातून आलेले लोक अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे गोंधळले. तवंदी घाटाजवळ, मुसळधार पाऊस आणि डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यांसह सर्व काही पाण्याखाली गेले होते. परिणामी मुसळधार पावसात अडकलेल्या प्रवाशांनी बांधकाम सुरू असलेल्या ओव्हरब्रीजखाली आश्रय घेतला होता. तिथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही जणांनी मोबाईलवर पावसाचे दृश्य टिपले. उन्हाळ्यात पावसाच्या पूर्वतयारीच्या अभावामुळे यावेळी काहीसा गोंधळ झाला.