• बैलहोंगल पोलिसांची कारवाई

बैलहोंगल / वार्ताहर

ट्रॅक्टरसह ट्रेलर चोरणाऱ्या आरोपींना अटक करण्यात बैलहोंगल पोलिसांना यश आले आहे. बसप्पा सत्यप्पा तलवार (वय २७) ,आडिवेप्पा लक्ष्मण चिंतामणी (वय २८), राजू शट्टूप्पा नायक (वय २६),सिद्धाप्पा शिवाप्पा चिकोप्पवड्डर (वय २०) ,परप्पा बसप्पा कड्डी (वय २१) सर्वजण (रा.नेलगंटी ता.गोकाक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सदर आरोपींनी बैलहोंगल तालुक्यातील होलेहोसुर आणि नेगीनल या गावांमधून ट्रॅक्टरसह ट्रेलरची चोरी केली होती.

या घटनेनंतर संबंधित गावांमधून ट्रॅक्टर ट्रेलर चोरीला गेल्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी बैलहोंगल पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. अटक केलेल्या आरोपींकडून पाच ट्रॅक्टर ट्रेलर, एक ट्रॅक्टर इंजिन, एक राउटर आणि अंदाजे १४ लाख रू. रोख रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपींची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुख डॉ.भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती के., आर.बी.बसरगी, डीवायएसपी इरय्या हिरेमठ, सीपीआय प्रमोद यलिगार, शिवानंद गुडागनट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथकाने ही कारवाई केली.

पीएसआय पी. एस. मृणाल, गुरुराज कलबुर्गी, इराप्पा रिठी, प्रवीण कोठी, एएसआय बी. बी. हुलकुंद, शंकर मेनासिनकायी, जे.आर. मळगली, चेतना बुद्धी एम. एस. देशनूर, के.एफ.वकुंद, शरीफसाब दप्तरदार, ए. एम. चिक्कोडी, सचिन पाटील, विनोद ठक्कन्नावर आदींचा कारवाईत सहभाग होता. बैलहोंगल पोलिसांच्या कामगिरीचे बेळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षक भीमशंकर गुळेद यांनी कौतुक केले आहे.