- बेळगाव – वेंगुर्ला मार्गावरील घटना
चंदगड : बेळगाव – वेंगुर्ला मार्गावर सुपे (ता. चंदगड) येथील आरटीओ नाक्याजवळ मंगळवारी दुपारी ट्रक आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस यांच्यात झालेल्या अपघातात बस चालक ठार झाला. तर वाहकासह बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. लक्ष्मण पांडुरंग हळदणकर (रा. चंदगड) असे मृत एसटी चालकाचे नाव असून ते चंदगड आगारात कार्यरत होते.

हा अपघात एवढा भीषण होता की , बसचा पुढील भागाचा चेंदामेंदा झाला असून ट्रकच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे. अपघाताच्या ठिकाणी वाहनांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
