• साडेतीन तोळे सोन्यासह तीस हजार रुपये लंपास

सुळगा (हिं.) / वार्ताहर

सुळगा (हिं.) येथील देशपांडे कॉलनीतील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेतीन तोळे सोने आणि तीस हजार रुपये असे एकूण साडेतीन लाखाची धाडसी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, देशपांडे कॉलनीतील कल्लाप्पा कुडचीकर हे नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेर गावी गेले होते. तर त्यांच्या पत्नी कामावरती बाहेरगावी गेल्या होत्या. दुपारी अडीच वाजता ते घराकडे परतले. त्यानंतर ते पुन्हा घराला कुलूप लावून त्याच गल्लीतील जुन्या घराकडे गेले. त्यांची पत्नी बाहेर कामाला गेली होती. तर मुले जुन्या घरातच होती. दुपारी चार वाजता कुडचीकर पुन्हा परत घरी आल्यानंतर घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडल्याचे त्यांना आढळून आले. घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तातडीने घरात जाऊन पाहिले असता तिजोरीचे दरवाजे खुले असून कपडे अस्ताव्यस्त पडले होते.

  • गावामध्ये भीतीचे वातावरण

रविवारी सायंकाळी हा प्रकार घडल्याने दिवसाढवळ्या चोरांनी हा केलेला चोरीचा प्रकार पाहता सुळगा गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.