पुणे / प्रतिनिधी

हवामान खात्याने आज महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसह २९ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, हरियाणा, पंजाबमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आला आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील २१ जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पाटणासह बिहारमधील २४ जल्ह्यिांमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

राजस्थानातील सहा जिल्ह्यांमध्ये गुरुवारी कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस ओलांडले. श्री गंगानगरमध्ये हंगामातील सर्वाधिक तापमान (४५.८ अंश सेल्सिअस) नोंदवण्यात आले. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. श्रीगंगानगरमध्ये बिकानेर- उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. १७ मे मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंडमध्ये हवामान खराब राहील तसेच, ओडिशामध्ये वादळासह पाऊस पडू शकतो. दक्षिण भारतात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस पडेल. ईशान्य भारतातील बहुतेक भागात सतत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात वादळासह हलका पाऊस पडू शकतो.

१८ मे : अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम, मेघालयात वादळाचा इशारा देण्यात आला आहे. गोवा, महाराष्ट्रात हलका पाऊस पडू शकतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार वादळे देखील येऊ शकतात.