बेंगळूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने मंगळवारी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने तब्बल अठरा वर्षानंतर प्रथमच आयपीएल चॅम्पियन्स किताब पटकावला. त्यानंतर संपूर्ण कर्नाटक राज्यातील क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाला उधाण आले. रात्रभर विजयाचा जल्लोष संपूर्ण राज्यभरात साजरा केला जात होता. दरम्यान बेंगळूर येथे आज चिन्नास्वामी स्टेडियम येथे विजयाचा जल्लोष साजरा केला जात होता. विधानसभेपासून स्टेडियम पर्यंत विजय रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्टेडियम बाहेर प्रमाणाबाहेर झालेली गर्दी त्यातच गेटवर सुरू असलेली आत घुसण्याची घाईगडबड यामुळे एकच गोंधळ झाला. याच गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू तर वीस जण जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा वाढवण्याचेही शक्यता व्यक्त केली जात आहे.