बेळगाव / प्रतिनिधी

एसएससी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून बेळगाव येथील सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी निधी नंदकुमार कंग्राळकर यांनी 625 पैकी 624 गुण घेत बेळगाव जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

बैलहोंगल रूपा पाटील हिने 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात, आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. बेळगाव अनगोळ येथे राहणारी निधी कंग्राळकर सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी आहे.