बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील एसएसएलसी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून बैलहोंगल तालुक्यातील गारमेंट कंपोझिट पीयू कॉलेज देवलापूरची विद्यार्थिनी रूपा चनगौडा पाटील हिने ६२५ पैकी ६२५ गुण मिळवत राज्यात संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्यातील एकूण २२ विद्यार्थ्यांनी ६२५ पैकी ६२५ गुण मिळवले आहेत.
निकालात बेळगाव जिल्हा २५ व्या स्थानी आहे. ३१५०३ पैकी १९५८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ६२.१६ टक्के निकाल लागला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्याचा निकाल ९१.१२ टक्के असून राज्यात प्रथम स्थानी आहे.