बेळगाव : किल्ला येथील रहिवाशी प्रभाकर नारायण गोजे पाटील (वय ९० वर्षे) यांचे आज बुधवार दिनांक ११ जून २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी १ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्योजक नितीन गोजे पाटील व उपप्राचार्या माधवी गोजे पाटील यांचे वडील होत.