बेळगाव / प्रतिनिधी

हॉकी बेळगाव संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरातून तयार होऊन युवा सक्षमीकरण व क्रीडा खात्याच्या स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड झाल्याबद्दल मयुरी कंग्राळकर, साक्षी पाटील, साक्षी चौगुले, आयेशा शेख व प्रवीण जक्कन्नावर या युवा हॉकीपटूंचे जिल्हाधिकाऱ्यांनी खास अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

हॉकी बेळगाव संघटनेकडे सराव करणाऱ्या मयुरी कंग्राळकर, साक्षी पाटील, साक्षी चौगुले आयेशा शेख या महिला हॉकीपटूंची म्हैसूर येथील युवा सक्षमीकरण व क्रीडा खात्याच्या स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये तर प्रवीण जक्कन्नावर याची बळ्ळारी येथील स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड झाली आहे. याबद्दल जिल्हाधिकारी (डीसी) मोहम्मद रोशन यांनी आपल्या कार्यालयामध्ये या हॉकीपटूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील असून देखील हॉकी खेळावर प्रभुत्व मिळवल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त महिला हॉकीपटूंचे विशेष कौतुक केले.

याप्रसंगी हॉकी बेळगाव संघटनेचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सरचिटणीस सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि सुनील जाधव अन्य उपस्थित होते.