बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या जेष्ठ शिक्षिका, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व शीतलताई बडमंजी यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. शीतल बडमंजी गेली २८ वर्षे मराठी विद्यानिकेतनमध्ये गणित विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. उत्तम वक्त्या , निवेदक व सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख होती. मराठी भाषा संवर्धन, शिक्षक प्रशिक्षण शिबीरे, महिलांचे सामाजिक प्रबोधन याबाबत त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
February 7, 2026
उद्या रविवारी शहर विकासावर ‘विकास मंथन’ कॉन्क्लेव्ह बेळगाव / प्रतिनिधी रिअल इस्टेट, बांधकाम आणि शहर विकासाचे भविष्य एकाच छताखाली मांडणाऱ्या क्रेडाई बेळगाव आयोजित ‘बेल्कॉन’ प्रदर्शनाला बेळगावकरांचा […]








