विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर शहरातील शतकपूर्ती साधलेली श्री सिद्धेश्वर संस्था यांच्यातर्फे बांधण्यात आलेल्या ‘शिवानुभव समुदाय भवना’चे लोकार्पण हुबळी येथील मूरुसाविर मठाचे श्री मनमहाराज जगद्गुरु डॉ. गुरुसिद्ध राजयोगींद्र स्वामीजी आणि कोप्पळ येथील गविमठाचे अभिनव गविसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या दिव्य उपस्थितीत, माजी केंद्रीय मंत्री, विजयपूर शहराचे आमदार आणि सिद्धेश्वर संस्थेचे अध्यक्ष बसवनगौडा पाटील यतनाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

या कार्यक्रमाला जिल्हा पालकमंत्री आणि मोठ्या उद्योग व पायाभूत सुविधा विकास मंत्री एम. बी. पाटील तसेच आमदार विठ्ठल कटकदोंड हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे, समुदाय भवनाच्या पहिल्या मजल्यावर दिवंगत बी. एम. पाटील यांच्या नावाने ‘प्रसाद निलय’, दुसऱ्या मजल्यावर दिवंगत आर. आर. कल्लूर यांच्या नावाने ‘अक्षता मंडप’, तिसऱ्या मजल्यावर ‘श्री कपिलेश्वर यात्रीनिवास’ यांचेही उद्घाटन करण्यात आले.समुदाय भवनात भावचित्रे बसवण्यासाठी देणगी दिलेल्या दानशूर व्यक्तींचा ही यावेळी सन्मान करण्यात आला.

या शुभप्रसंगी ज्ञान योगाश्रमाचे अध्यक्ष श्री बसवलिंग स्वामीजी, ज्ञानयोगाश्रम व बिळिगिरीरंगनबेट्टा येथील निर्मलानंद स्वामीजी यांच्या आश्रमातील श्री शांत मल्लिकार्जुन स्वामीजी, विविध मान्यवर, नेते,कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.