विजयपूर / दिपक शिंत्रे
बागलकोट नवनगर येथील श्री सद्गुरू माणकोजी बोधले महाराज मठाचा तृतीय वार्षिक उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवानिमित्त दि. २७, २८ व २९ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे गुरुवर्य ह. भ. प. यशवंत प्रभाकरदादा बोधले महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
दि. २७ मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता पोथी स्थापना व कळस पूजन, ठिक 7 वाजता किर्तन तर रात्री लक्ष्मण ईश्वर मंचलकर यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन, दि.२८ बुधवार रोजी पहाटे सहा वाजता काकड आरती, ठिक ७ ते १० वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय पारायण, नंतर धनंजय व्यंकटेश माळवदकर यांच्यावतीने अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली आहे. ठिक ११ ते १ वाजेपर्यंत किर्तन दुपारी शटराज लातुरकर यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन, सायंकाळी ४ ते ६ पर्यंत नामजप व प्रवचन, ६ ते ७ हरीपाठ भजन ७ ते ९ पर्यंत किर्तन नंतर सुनील दत्तात्रय कपाटे यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन, दि.२९ गुरुवारी पहाटे सहा वाजता काकड आरती, ठिक ८ ते १० वाजेपर्यंत दिंडी प्रदर्शन, काला किर्तन नंतर संतोष कर्णे व व्यंकटेश मिरजकर यांच्या कडून अल्पोपहार व्यवस्था, त्यानंतर अध्यात्मिक संस्कार शिबिराचे समारोप समारंभ तर दुपारी १ वाजता ईश्वर सुगंधी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे गुरुवर्य ह.भ.प. श्री यशवंत प्रभाकरदादा बोधले महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.