बेळगाव / प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री दत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्या वतीने श्रीपंत गुरुचरित्र पोथीचे समुदायिक वाचन शिबिर व श्री पंत बोधपीठ वासंतिक शिबिर आयोजित करण्यात आले आहे.आज रविवार दिनांक ११ मे पासून गुरुचरित्र पोथी वाचन आणि श्रीपंत बोधपीठ वासंतीक शिबिराला सुरुवात झाली आहे.मंगळवार दिनांक १३ मे रोजी श्रीपंत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री पंत गुरुचरित्र पोथी सामुदायिक वाचन शिबिर व श्री पंत बोधपीठ वासंतीक शिबिरा दरम्यान शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींना सामुदायिक नामस्मरण, भजन, पालखी सेवा,बालगोपाळांचा विशेष कार्यक्रम अधिक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन आले आहे.
त्याचबरोबर मंगळवारी सकाळी प्रातःस्मरण, आरती, सामुदायिक नामस्मरण, पोथी वाचन सत्र पाचवे व त्यानंतर सकाळी ११ ते १२.३० वा. या दरम्यान श्रीपंत विवाह सोहळा होणार आहे.दुपारी महाप्रसाद व त्यानंतर तीन ते साडेपाच या वेळेत पोथी वाचन सहाव्या सत्राची सांगता होईल. सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत पालखी सोहळा होणार आहे.