बेळगाव : सुळगा (उ.) वेंगुर्ला रोड, येथील रहिवासी सुळगा (उ.) ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिक तथा अडत व्यापारी श्री. अशोक चंद्रू पाटील (वय ७५) यांचे आज गुरुवार दि. २७ मार्च रोजी सकाळी ६ वा. अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, तीन भाऊ, भावजयी, पुतणे – पुतण्या, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज गुरुवारी दुपारी २.३० वा. सुळगा (उ.) स्मशानभूमीत होणार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वा. होणार आहे.