बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शिवसेना उपशहर प्रमुख, समर्थनगर येथील पंच प्रकाश बंडू राऊत (वय ५२) (रा. मूळगाव बडस सध्या राहणार समर्थनगर बेळगाव) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता सदाशिवनगर येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
प्रकाश राऊत हे व्यवसाया निमित्त बेळगावात स्थायिक झाले होते. बापटगल्ली येथे मोबाईल दुरुस्ती आणि डिश टीव्ही व्यवसाय करीत होते. बेळगावात येण्यापूर्वी काही वर्षे ते मुंबईत नोकरी करीत होते. त्यावेळी ते शिवसेनेचे कार्यकर्ते बनले. मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या वार्डात ते राहत होते. त्यामुळे त्यांच्याशी त्याचा जवळचा संबंध होता. बेळगाव मधील शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने एका सच्च्या शिवसैनिकाचा अकाली अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.