- मार्केट पोलिस स्थानकात शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
शिवजयंती मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई आहे. तेव्हा मंडळांनी मिरवणुकीत केवळ पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, सर्वांनी नियमांचे पालन करावे अशा सूचना सहाय्यक पोलिस आयुक्त सदाशिव कट्टीमणी यांनी शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.
बेळगावात गुरुवार १ मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मार्केट पोलिस ठाण्यात शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत शिवजयंती मिरवणुक शांततेत आणि सुरळीत पाडण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव,रणजित पाटील, शिवाजी मंडोळकर, रोहन जाधव, अनंत बामणे, मेघन अरुण पाटील आदी उपस्थित होते.