बेळगाव / प्रतिनिधी

शहापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे कै. नारायणराव गुंडोजीराव जाधव सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने फुलांची रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय एस.एस.सिमानी, माजी उपमहापौर संजय शिंदे, युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके, अमृत भाकोजी व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर मालोजी अष्टेकर होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक नेताजी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. शुभम शेळके यांनी राजस्थानमध्ये साजरी केली जाणारी फुलांची रंगपंचमी बेळगावात साजरी करणाऱ्या ट्रस्टचे अभिनंदन केले. आपले सर्व सण शांततेत पार पाडावेत, तसेही त्यांनी आवाहन केले.

यावेळी बोलताना मालोजी अष्टेकर यांनी कै. नारायणराव जाधव ट्रस्टने आत्तापर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली. फुलांची रंगपंचमी आयोजित करून प्रदूषण मुक्त रंगपंचमी कशी साजरी करतात याचा आदर्श पाठ ट्रस्टने घालून दिला आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात संजय शिंदे व यल्लाप्पा कोलकार यांनी विचार मांडले. कार्यक्रमास ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुलाब पुष्प देऊन नेताजी जाधव, बापू जाधव, विजय जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर उपस्थित आणि फुले उधळून आनंदात रंगपंचमी पार पडली.

यावेळी दिलीप दळवी, प्रभाकर भाकोजी, अशोक चिंडक, यल्लाप्पा कोलकार, दयानंद जाधव, परशराम घाडी, युवराज जाधव, साईराज जाधव, सतीश शिंदे यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.