सौंदत्ती / वार्ताहर

शेतातून चारा गोळा करून परतत असताना वीज पडून दोन शेतकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हिट्टणगी (ता.सौंदत्ती ; जि. बेळगाव) येथे ही घटना घडली. या घटनेमुळे जिरगीवाड कुटुंबाला धक्का बसला आहे. गंगव्वा जिरगीवाड आणि कलावती जिरगीवाड अशी त्या दोन्ही मृत महिलांची नावे आहेत. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.