सौंदत्ती / वार्ताहर
जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. सौंदत्ती शहरातील एपीएमसीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. मृतदेहाशेजारी विटा आणि दगडही सापडले आहेत. ज्यामुळे हत्येचा संशय अधिक बळावला आहे. घटनेची माहिती मिळताच सौंदत्तीचे सीपीआय धर्मकर धर्मट्टी आणि पीएसआय के. एम. बन्नूर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.