सौंदत्ती : कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिराचा विकास करण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागांतर्गत प्रसाद योजनेतून यल्लम्मा मंदिराचा कायापालट होणार आहे. नुकत्याच या कामासाठी निविदा मागवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात मंदिर परिसराचा विकास होणार आहे.
पर्यटन विभागाने १ हजार ८३७.२७ लाख रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस गृहीत धरून पुढील नऊ महिन्यात कंत्राटदाराला हे काम पूर्ण करावे लागणार आहे. या निधीतून मंदिराचा विस्तार करण्यासोबतच नवीन सुविधा दिल्या जाणार आहेत. यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.इच्छुक कंत्राटदारांना या निवेदन निविदेमध्ये संधी दिली जाणार आहे.
श्री रेणुका देवी मंदिराला वर्षभर लाखो भाविक भेट देत असतात. परंतु या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्याने वेळोवेळी भक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असते. त्यामुळे राज्य सरकारने भरीव निधी दिला असून कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.