बेळगाव : सत्तर वर्षांपूर्वी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी वीरगोट्ट येथील आडविलिंग स्वामीजींनी सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीस तब्बल ४.५ लाख रुपये किंमतीची सुवर्णलेपित साडी अर्पण केली आहे. गुरुवारी हा नवस पूर्ण करण्यात आला.

विजयपूर जिल्ह्याच्या जंबगी येथील प्रभुदेव डोंगरावर वसलेल्या शिवयोगीश्वर महाराजांनी, ही मनोकामना व्यक्त केली होती. रेशमी धाग्यांनी सजवलेली आणि सोन्याची जर असलेली रेशमी साडी अर्पण करण्याचा त्यांचा नवस होता. तो नवस आता पूर्ण झाला आहे. साडी अर्पण करण्याच्या वेळी वीरघट्टाचे आडविलिंग महाराज, विवेक चिंतामणी श्री, विजयपूर येथील व्यापारी बाबुरायगौडा बिरादार, कलावती बिरादार आदी उपस्थित होते.