बेळगाव : सार्वजनिक वाचनालय या संस्थेने राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने खरेदी केलेल्या 500 हून अधिक ग्रंथांचे प्रदर्शन सार्वजनिक वाचनालयात बुधवारी सकाळी भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे जेष्ठ संचालक अँड ईश्वर मुचंडी व अभय याळगी यांच्या हस्ते सकाळी 11.30 वा. होत आहे. हे प्रदर्शन वाचकांसाठी एक आठवडाभर राहणार आहे.

  • “सायंकाळी गुरुदेव रानडे मंदिरात कार्यक्रम”

आज असलेल्या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून सायंकाळी 5 वाजता गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी येथे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांचे “वाचू आनंदे” या विषयावर व्याख्यान होणार आहे. दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, कार्यवाह सुनीता मोहिते व सहकारी यांनी केले आहे.