- मुख्य बाजारपेठेतील व्यवहार सकाळपासून ठप्प
बेळगाव / प्रतिनिधी
संतीबस्तवाड (ता. बेळगाव) येथे मशिदीतील धर्मग्रंथ (कुराण) जाळण्यात आले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुस्लिम समाजाने आज बेळगावमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. परिणामी खबरदारी म्हणून शहरात कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर बेळगाव शहराच्या प्रमुख बाजारपेठेतील खडे बाजार, दरबार गल्ली, भेंडीबाजार, आझमनगर, आझादनगर, गांधीनगर आदी भागात सकाळपासूनच व्यवहार ठप्प झाले आहेत. धर्मग्रंथ जाळण्याच्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. दरम्यान मुस्लिम समाजाने या घटनेचा निषेध करण्यासाठी आज शहरात बंद पुकारला आहे.